मुख्य बातम्या

Video; ससुनच्या डॉ अजय तावरेंनी आणखी एक चुकीचा अहवाल दिल्याचा शिरुरच्या मुलानी-शेख कुटुंबाचा गंभीर आरोप

शिरुर (तेजस फडके) पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाचा भोंगळ कारभार (Pune Porsche car accident) समोर येत असुन दिवसेंदिवस डॉ अजय तावरे यांच्या अडचणीत वाढ होत असताना शिरुर तालुक्यातील करडे या गावातील शेख आणि मुलाणी कुटुंबियांनीही 2018 मध्ये तावरेंनी ब्लड रिपोर्ट बदलल्याचा प्रकार केल्याचा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

पोर्शे अपघात प्रकरणात ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware) आणि श्रीहरी हळनोर या दोघांनी ब्लड रिपोर्ट (Blood Report) बदलत फेरफार केल्याचं समोर आल्याने पुणे पोलिसांनी थेट त्यांना अटक केली आहे. मात्र हा प्रकार अजय तावरे यांनी पहिल्यांदाच केला नाही तर यापूर्वीही तावरेंनी असे प्रकार अनेकवेळा केल्याचं आता समोर आलं आहे.

 

सन 2018 मध्येही डॉ तावरे यांनी असाच एक चुकीचा रिपोर्ट दिल्याचा आरोप शिरुरच्या मुलानी आणि शेख कुटुंबीयांनी केला आहे. रेहाना शेख यांचा दि 11 ऑगस्ट 2018 रोजी प्रसुतीनंतर रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला होता. मात्र संबंधित डॉक्टरने प्रसुतीच्या आधी रेहाना शेख यांना रक्ताची गरज असतानाही रक्त उपलब्ध करुन ठेवलं नव्हतं. त्यामुळे संबधित डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने हा मृत्यू झाल्याचा आरोप रेहाना यांचे भाऊ आणि पती यांनी केला होता.

 

त्यावेळी डॉक्टर अजय तावरेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली गेली. मात्र तावरेंनी 27 नोव्हेंबर 2018 ला डॉक्टरांच्या बाजूनं अहवाल दिला. त्यानंतर मग या कुटुंबाने ब्लड बँकेतून 21 जानेवारी 2019 रीतसर माहिती घेतली असता तेंव्हा डॉक्टर तावरेंनी पैशांसाठी चुकीचा अहवाल दिल्याचं या दोन्ही कुटुंबियांच्या लक्षात आलं. तावरेंनीपैशाच्या हव्यासापोटी चुकीचा अहवाल दिल्याने मुलानी आणि शेख कुटुंबियांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. अजुनही त्यांचा न्यायालयीन लढा सुरुचं आहे.

 

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याप्रकरणी ससूनचे डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हाळनोर या दोघांचे निलंबन करण्यासाठीचा अहवाल पोलिसांमार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविण्यात आला आहे. निलंबन होण्यासाठी आवश्यक असलेली पोलीस कारवाई त्यांच्यावर झालेली आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधित विभागाला याबाबत बुधवारी अहवाल पाठवला आहे. या अहवालावर संबंधित विभागाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या

शिंदोडी येथे प्रशासन पाठमोरे होताच बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु; मस्तवाल मातीचोर कुणालाही घाबरेनात

रांजणगाव MIDC मध्ये दोन युवकांना मारहाण करत दहशत पसरवुन दुचाकी जाळणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव पोलिस स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘एकता दौड’

रांजणगाव गणपती (तेजस फडके) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता दिवस (Run…

52 मिनिटे ago

शिरूर! कोरेगाव भीमा येथे खाजगी बसला भीषण आग…

कोरेगाव भीमा (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ आज (गुरुवार) आठवडे बाजाराच्या…

2 दिवस ago

रांजणगाव एमआयडीसी पोलीसांकडून सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रमाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस विभागातर्फे रांजणगाव एमआयडीसी…

2 दिवस ago

Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे, असा ठाम विश्वास…

3 दिवस ago

शिरूर! हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत पोलिसांचेही डोळे पाणावले…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) दुपारी एक भावनिक…

4 दिवस ago

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तलाठ्याची आरेरावीची भाषा; आत्ता जाग आली का…

शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान…

4 दिवस ago