शिरुर (तेजस फडके) मुस्लिम विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या नेतुत्वाखाली आणि मुस्लिम विकास परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शेरखान अकबरखान यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर येथील हॉटेल सदगुरु येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये पुणे जिल्हा कार्यकारणी तसेच मुस्लिम समाजाच्या समस्या आणि अडचणीवर चर्चा करण्यात आली.या बैठकीमध्ये सर्वांनुमते पुणे जिल्हा तसेच शिरुर तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
मुस्लिम विकास परिषदेच्या पुणे जिल्हा ‘अध्यक्ष’ पदी शिरुर येथील सामाजिक कार्यकर्ते हुसेन शाह, पुणे जिल्हा ‘संपर्कप्रमुख’ पदी पञकार रिजवान बागवान, शिरुर तालुका ‘अध्यक्ष’ पदी निर्वीचे शकील मनियार, शिरुर तालुका ‘उपाध्यक्ष’ पदी हिवरे कुंभारचे राजमोहम्मंद आत्तार, शिरुर शहर ‘अध्यक्ष’ पदी फिरोज सिकलकर यांची नियुक्ती करण्यात आली.
या बैठकीमध्ये महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शेरखान अकबरखान यांचा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्रच्या सचिव रेश्मा शेख, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष राजु शेख, बादशहा शेख, मुसाभाई शेख, साहिल शेख, शौकत शेख आदि मुस्लिम समाज बांधव बहुसंख्येंने उपस्थित होते.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…