मुख्य बातम्या

तहसील कार्यालय शिरूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाची विशेष बैठक संपन्न

शिरूर (अरुणकुमार मोटे): तहसिलदार शिरूर यांच्या दालनामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाची आढावा बैठक तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख आणि ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा या संस्थेचे पदाधिकारी आणि साधक उपस्थित होते.

याप्रसंगी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय दिन ग्राहक सप्ताहाच्या कार्यक्रमाची व्यवस्थित आखणी, नियोजन झालेले आहे. सर्वच शासकीय कार्यालयांनी आपल्या कार्यालयाची माहिती देणाऱ्या माहिती पुस्तिका तयार कराव्यात. यामधून ग्राहकांचे प्रबोधन होईल. सप्ताहामध्ये सर्वच विभागांनी आपापसात समन्वय साधून या सप्ताहात आपला कृतिशील सहभाग नोंदवावा. तसेच 24 डिसेंबर (राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या) या दिवशी तालुक्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन व्हावे अशा सूचना पंचायत समिती शिक्षण विभागाला दिल्या.

या बैठकीस ग्राहक पंचायत संस्था पुणेचे राज्य-अध्यक्ष श्री.अशोक भोरडे, तालुकाध्यक्ष श्री. अरुणकुमार मोटे, उपाध्यक्ष अतुल पाचुंदकर, सचिव उद्धव जाधव, संघटक ओंकार जाधव, सहसंघटक योगेश शेंडगे, सर्वश्री. संतोष साखरे भागिनाथ फंड,गणेश कोतवाल, बापूसाहेब शिवले, नामदेव शिवले, अमित राऊत, प्रमोद चौधरी, प्रदीप रासकर व पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच,शिरूरचे पो नि. संदेश केंजळे, रांजणगाव पो. स्टेशनचे पो. नि. महादेव वाघमोडे, पुरवठा निरीक्षक सदाशिव व्हनमाने, तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक, वनपरिक्षेत्राधिकारी निळकंठ गव्हाणे, उपअभियंता स्थापत्य अ. मगर, उपअभियंता MIDC रांजणगाव, उपकार्यकारी अभियंता महावितरण शिरूर शरद माने, सहाय्यक वाहतूक अधिक्षक भैरवनाथ दळवी, दुय्यम निबंधक ए. व्ही. जाधव, विस्ताराधिकारी शिरूर एस. घोडे, सामाजिक वनीकरणचे बबन गायकवाड, दुय्यम निबंधक तळेगाव ढमढेरे सुरज बाबर, भूमीअभिलेखचे संजय गुरव, वजन मापे निरीक्षक संतोष दराडे, पोलीस उपनिरीक्षक शिक्रापूर जितेंद्र पानसरे आदी बैठकीस उपस्थित होते. पुरवठा निरीक्षक दिपक केदार यांनी आभार मानले.

सदर बैठकीत ग्राहक दिनानिमित्त ग्राहक हक्क, तक्रार नोंदणी प्रक्रिया आणि कायदेशीर तरतुदी याबाबत मार्गदर्शन तसेच नागरिकांना योग्य सेवा, पारदर्शक व्यवहार आणि फसवणूक टाळण्यासाठी,ग्राहक तक्रारींचे वेगवान आणि प्रभावी निराकरण करण्याबाबत तालुक्यात ग्राहक जनजागृती मोहीम राबविण्याबाबत नियोजन करण्याचे ठरले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

3 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

3 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

3 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

3 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

3 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

3 दिवस ago