शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात नुकत्याच चार गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सोनेसांगवी ग्रामपंचायतमध्ये बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या महिलेची सरपंचपदी वर्णी लागली असुन अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, युवासेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष बापु शिंदे यांनी या गावातील कार्यकर्त्यांना ताकत दिल्याने निवडणुकीत रंगत आली. परंतु राष्ट्रवादीच्या शिरुर-आंबेगावच्या एका बड्या नेत्याने सोनेसांगवी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातल्याने अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामुळे सरपंचपद जिंकलेल्या गटाने पुणे-नगर रस्त्याच्या कडेलाच राजमुद्रा चौकात मोठा बॅनर लावला असून त्या ‘बॅनर’ वर “आता कस वाटतय” ‘आम्ही सोनेसांगवीकर’ असा मजकुर असल्याने या बॅनरची चर्चा सगळ्या तालुकाभर सुरु आहे.
मांडवगण फराटा, सोनेसांगवी, काठापुर, करंजावणे या गावच्या ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पुर्व भागातील मांडवगण फराटा ग्रामपंचायतमध्ये घोडगंगा साखर कारखान्याचे विद्यमान संचालक दादा पाटील फराटे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे सुधीर फराटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला यश मिळाले. भाजपाचे दादा पाटील फराटे यांच्या सुनबाई समीक्षा फराटे या थेट जनतेतुन सरपंच म्हणुन निवडुन आल्या तर सोनेसांगवी गावात रेखा मल्हारी काळे या थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या.
गाव करील ते राव करील काय…?
शिरुर तालुक्यात स्थानिक पातळीवर असणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत गावा बाहेरचे राजकीय पुढारी लक्ष घालतात. तसेच आपल्याच विचारांचा सरपंच किंवा सदस्य किंवा सहकारी सोसायटीत आपल्याच विचाराचा चेअरमन किंवा सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करतात. त्यासाठी गावापातळीवरील निवडणुकीत ते वेळप्रसंगी स्थानिक लोकांना पैशाची रसद सुद्धा पुरवतात.
सध्या जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवणुका डोळ्यासमोर ठेऊन शिरुर-आंबेगाव मधील एका बड्या नेत्याने त्याच्या परीसरातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत तसेच सोसायटीच्या निवडणुकीत लक्ष घालत अनेक गावात स्वतःच्या मर्जीतील कार्यकर्ते निवडुन येण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यात काही गावात यश तर काही ठिकाणी अपयश आले. सोनेसांगवीतही या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने सरपंचपदाच्या उमेदवारासाठी आर्थिक रसद पुरविल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा असून नेत्याचा विरोध झुगारत ग्रामस्थांनी बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या उमेदवाराला थेट जनतेतुन सरपंच म्हणून निवडून दिले असल्याने “गाव करील ते राव करील काय” या म्हणीचा प्रत्यय या बड्या नेत्याला आला आहे. “आता कस वाटतंय” असा मजकूर छापलेला बॅनर लावल्याने चर्चेला उधाण आले आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…