विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची वढू बुद्रुक सह परिसराला भेट
शिक्रापूर (शेरखान शेख): एक जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या लक्षात घेता यावेळी ही अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, अशी मागणी करताणाच प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह वढू बुद्रुक तसेच विजयरणस्तंभ येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ, गोविंद गोपाळ यांच्या समाधिस्थळासह, शिक्रापूर तोरणा पार्किंग, मुलाणी मस्जिद ट्रस्ट पार्किंग, पेरणे फाटा, तुळापूर फाटा येथे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी भेट देत पाहणी केली यावेळी पोलीस उपअधीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी देखील भेट देत स्थळ पाहणी केली. यावेळी कोरेगाव भीमा येथे सरपंच अमोल गव्हाणे, पंचायत समितीचे माजी सदस्य पी. के. गव्हाणे, घोडगंगाचे माजी संचालक कैलासराव सोनवणे, शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल काशिद, माजी सरपंच विजय गव्हाणे, संदिप ढेरंगे, सदस्य केशव फडतरे, संपत गव्हाणे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, राजेंद्र गवदे, सचितानंद कडलक, नितीन गव्हाणे, बन्सी फडतरे यांसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी कोरेगाव भीमा येथील दोन्ही पुलावर स्वच्छता करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने एक जानेवारी रोजीच्या अभिवादन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. तसेच नवीन पुलाला रंग देण्यात येत आहे.
कोरेगाव भीमा येथील एस टी महामंडळाच्या जागेची साफ सफाई करण्यात आली असून मोठा पोलीस फौज फाटा, अग्नीशमन दलाच्या गाडया व पि एम टी गाड्या वळवण्यासाठी व वैद्यकीय मदत केंद्र याठिकाणी जागा आरक्षित करण्यात आली असुन त्यासाठी येथील स्वच्छता प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…