शिरूर तालुका

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात विद्युत वाहिनीची तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे १० एकर आडसाली ऊस जळून खाक झाल्याची घटना दि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पिंपळसुटी (ता. शिरुर) येथे हा प्रकार घडला असुन विद्युत वाहिनीची तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे १० एकर आडसाली ऊस जळाल्याने येथील शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत रावसाहेब यशवंत फराटे, (वय ६०, रा. पिंपळसुटी, ता. शिरूर, जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांडवगण फराटा येथील पोलिस चौकीत तक्रार दखल केली आहे.

रावसाहेब फराटे गट नं २७० मधील ८५ आर क्षेत्रातील आडसाली ऊस तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या गट नं. २७० व २७१ मधील ऊसाला आग लागली. सदर आगीत गट नं. २७० मधील एकूण ३४० आर व गट नं. २७१ मधील ६० आर, असा एकूण ४०० आर (सुमारे १० एकर) ऊस जळून नुकसान झाल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

शेतातून गेलेल्या महावितरणच्या मुख्य विद्युत वाहिनीची तार तुटल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असुन जमीन मालक शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने ऊस जळून मोठे नुकसान झाले. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार संपत खबाले हे करत आहेत.

Video! पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव गणपती मंदिरासमोर बस जळून खाक…

Video: वाघाळे येथे शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक…

शिरुर; पारोडीत वीज पडून दुमजली बंगल्याचे नुकसान घरातील सर्व विद्युत उपकरणे जळून खाक

शिरुर तालुक्यात कंटेनर इलेक्ट्रिक पोलला धडकून कंटेनर मधील २१ लाखाचे पार्सल जळून खाक…

Video! नगर-पुणे महामार्गावर धावत्या कंटेनरच्या टायरला आग; टाकीजवळच भडका…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

15 तास ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

2 दिवस ago