मुख्य बातम्या

शिरुर-आंबेगावच्या ‘वाल्या’चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शिरुर-आंबेगावचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी भीमाशंकर सहकारी कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांच्या पत्नीच्या नावावर रांजणगाव गणपती येथे पाच एकर जमीन असल्याचा आरोप केला होता. तर त्या जमिनीची कागदपत्र पाचुंदकर यांनी १६ ऑक्टोबर पर्यंत काढुन ठेवावी मी ती जमीन त्यांच्या नावावर करतो असे प्रति आव्हान निकम यांनी पाचुंदकर यांना दिले होते.

परंतु १६ ऑक्टोबर पर्यंत वाट पाहुनही मानसिंग पाचुंदकर यांनी जमिनीची कागदपत्र किंवा त्याबाबतचा पुरावा सादर न केल्याने देवदत्त निकम यांनी काल (दि १७) रोजी वाल्मिकी जयंतीच्या दिवशी रांजणगाव येथे पत्रकार परिषद घेत पाचुंदकर यांच्यावर टिका करत त्यांचा खरपूस समाचार घेतला.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सभेत मानसिंग पाचुंदकर हे देवदत्त निकम यांच्या अंगावर धावून गेले होते. त्यानंतर निकम यांनी पत्रकार परिषद घेत सन २००८ साली पाचुंदकर यांचे नाव तडीपारीच्या यादीत असल्याबाबत चा पुरावा सादर करत पाचुंदकर हे गुंड असल्याची टिका केली होती. त्यानंतर मानसिंग पाचुंदकर यांनी एका सभेत हो सन २००८ साली माझे नाव तडीपारीच्या यादीत होते. पण दिलीप वळसे पाटील यांच्या सानिध्यात आल्यानंतर ‘वाल्या’ चा ‘वाल्मिकी’ झाला असल्याचे विधान केले होते.

 

तसेच देवदत्त निकम यांच्या पत्नी राजश्री निकम यांच्या नावावर रांजणगाव गणपती येथे पाच एकर जमीन असल्याचा आरोप करत ती जमीन त्यांनी रांजणगाव देवस्थान किंवा ग्रामपंचायत यांना दान करावी असे विधान पाचुंदकर यांनी केले होते. त्यानंतर देवदत्त निकम यांनी त्याला प्रति आव्हान देत जर माझ्या किंवा पत्नीच्या नावावर पाच एकराचा सातबारा असेल तर पाचुंदकर यांनी शिरुर किंवा तळेगाव ढमढेरे येथील सब रजिस्टर कार्यालयात येऊन तो कागद आणावा मी स्वतःच्या खर्चाने ती जमीन खरेदीखत करुन मानसिंग पाचुंदकर यांच्या नावे करुन देतो असे निकम यांनी सांगितले होते.

 

परंतु १६ ऑक्टोबर उलटूनही मानसिंग पाचुंदकर यांनी देवदत्त निकम यांचे आव्हान स्वीकारले नाही किंवा त्याबाबत काही विधानही केले नाही. त्यामुळे काल (दि १७) रोजी निकम यांनी रांजणगाव गणपती मंदिरात येऊन प्रथम महागणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर एका हॉटेल मध्ये पत्रकार परिषद घेत पाचुंदकर यांच्यावर शेलक्या शब्दात टिका करत त्यांचा खरपूस समाचार घेतला.

 

यावेळी बोलताना निकम म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शिरुर-आंबेगावचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर ऊर्फ ‘वाल्या’ याने दिलेल्या आव्हानाचा स्विकार करुन मी आज रांजणगाव येथे आलो असुन मी दिलेले आव्हान त्यांनी स्वीकारले नाही. शिरुर-आंबेगावचे स्वयंघोषित वाल्मिकी जो वास्तविक ‘वाल्या’ च आहे. त्याच्या नावावर जातेगांव खुर्द गट क्रं ९१/१ मध्ये २ हेक्टर १० आर क्षेत्र असुन त्यांनी ती ज्या भावंडांच्या पाठीवर पाय देऊन तुम्ही राजकारणात आलाय त्यांना स्वखुशीने द्यावी किंवा जमीन भावंडांना द्यायची नसेल तर रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट आणि रांजणगाव ग्रामपंचायतला अर्धी अर्धी दान करावी असा टोला लागवला.

दिलीप वळसे पाटलांच्या बॅनरवरुन ४२ गावचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्याचा फोटो गायब; चर्चांना उधाण

शिरुर-हवेलीत कसा जमणार सत्तेचा खेळ…? आचारसंहिता जाहीर झाली तरीही महायुतीचा अजुनही नाही मेळ

शिरुर-हवेलीतुन ज्ञानेश्वर कटके प्रबळ दावेदार; महायुतीकडुन ज्ञानेश्वर कटके निवडणुकीच्या रिंगणात…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

18 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago