dilip-walse-patil

दिलीप वळसे पाटलांच्या बॅनरवरुन ४२ गावचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्याचा फोटो गायब; चर्चांना उधाण

मुख्य बातम्या राजकीय

कारेगाव (तेजस फडके) शिरुर-आंबेगाव मतदार संघाचे आमदार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा शिरुर तालुक्यातील शिरुर आंबेगाव मतदार संघातील रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात आज (दि ३०) दौरा आहे. मात्र या दौऱ्याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनेक बॅनरपैकी एका बॅनरवर शिरुर-आंबेगाव मतदार संघातील ४२ गावचं गेल्या अनेक वर्षापासून नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्याचा फोटो गायब असल्यामुळे “शेवटी नेता हा नेता असतो, आपल्या अंगलट आल की त्याचे गुण तो दाखवतोच” अशी दबक्या आवाजात सगळीकडे मोठया प्रमाणात चर्चा सुरु आहे.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सर्व साधारत सभेत शिरुर-आंबेगावचं प्रतिनिधित्व करणारा हा बडा नेता कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक देवदत्त निकम यांच्यावर धावुन गेला होता. त्यानंतर देवदत्त निकम यांनी पत्रकार परिषद घेत त्या बड्या नेत्यावर टिका करत त्याची खरडपट्टी काढली होती. वळसे पाटील यांच्या आजच्या दौऱ्याच्या काही बॅनरवर या बड्या नेत्याचे फोटो वगळण्यात आल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे.

शिरुर-आंबेगावमध्ये महायुतीत मिठाचा खडा…?  

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांचा रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात आज दौरा असताना सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल झाली असुन ती खालीलप्रमाणे

“सोनेसांगवीच्या विकासात शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे शिरुर-आंबेगावचे तालुकाध्यक्ष मल्हारी काळे यांचे जेवढे योगदान आहे. त्याच्या शुन्य टक्के ही दुसऱ्या तालुकाध्यक्षाचे योगदान नाही. तरीही त्यांचे नाव उदघाटनाच्या बोर्डावरती प्रमुख उपस्थिती मध्ये आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती असताना जाणुनबुजून राजकारणासाठी नाव वगळ्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हेतु आहे. याचा आम्ही सोनेसांगवी ग्रामस्थ व शिवसैनिक जाहीर निषेध करतो.”

अशा आशयाची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली असुन या पोस्टमुळे विधानसभा निवडणुकीपुर्वीच शिरुर-आंबेगाव मतदार संघातील ४२ गावामध्ये महायुतीच्या घटक पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यामध्ये विकासकामांच्या बॅनरवरुन अंतर्गत धुसफुस सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे.

शिंदोडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वप्निल वाळुंजचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदिपक यश

शिरुर तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवत परप्रांतीय युवकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्यातील दोन वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला केली अटक