मुख्य बातम्या

कांद्याने केला गरीब बळीराजाचा वांदा, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोडमडले…

शिरुर (अरुणकुमार मोटे) कांद्याला यंदा चांगला भाव मिळेल… त्या येणाऱ्या पैशामधून बॅकेचे कर्ज फेडु…मुलांचे शिक्षण, लग्न करू… हे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नाचे इमले केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे बेचिराख झाले ..अशी खंत शिरूर तालुक्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नवी दिल्लीचे सदस्य बाळासाहेब पडवळ, शेतकरी वैभव शेलार, सागर दंडवते या शेतकऱ्यांनी यांनी व्यक्त केली आहे.

शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. रब्बी हंगामातील कांद्यासाठी हवामान पोषक असल्यामुळे साडेचार महिन्यात कांद्याचे उत्पादन चांगले येते एकेकाळी दुष्काळी समजल्या जाणाऱ्या शिरुर तालुक्यात चासकमान, मीना शाखा ,डिंभा ,घोड या चार कालव्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती ओलिताखाली आली असून कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

कांदयांच्या उत्पादनासाठी कांदा बी , नांगरट , मशागत, रासायनिक खते ,विज बिल तसेच मजुरीचे दर लावगडीसाठी ३५० ते ४०० रुपये झाल्याने उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. मार्च महीन्यात काढलेला कांदा बाजार भाव २० रुपयांच्या आत असेल तर शेतकरी साठवून ठेवतात . यावर्षी मार्च पासुनचं चांगला भाव नसल्यांने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवलेला आहे.

अनेक वेळा खराब हवामान, उन्हाळ्यात कांदा जास्त तापला किंवा पाऊस जास्त झाला. तरी संपुर्ण कांदा चाळीत सडुन जातो. गेल्या वर्षी वर्षभर योग्य भाववाढ न झाल्याने कांदा मोठ्या प्रमाणात सडला,अनेक शेतकऱ्यांना स्थानिक व्यापाऱ्यांना फसविले. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यावर्षी योग्य भाव मिळेल अशी आशा शेतकरी वर्गाला होती. मागील पंधरा दिवसापुर्वी अनेक बाजार समित्यामधे ३० रुपये पर्यंत बाजारभाव गेले. त्यामुळे शेतकरी वर्गात चैतन्य निर्माण झाले होते.

कांद्याचे पैसे झाल्यानंतर मुला मुलींच्या शिक्षणाची फी,लग्न, दवाखान्याची उधारी, कर्जाचे हप्ते, खते औषधाचे उधारी सर्व काही मिटवून टाकू अशी अनेक स्वप्न पाहणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी झाली आहे .

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

13 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago