मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात रक्षाबंधनासाठी भावाकडे जाण्याच्या तयारीत असतानाच बहिणीचा मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे): भाऊ- बहिणीचे अतूट नाते रेशीम धाग्यांनी विणनारा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र, या वर्षीचा हा सण एका भावासाठी काळा दिवस ठरला. बुधवारी (ता. ३०) सणाच्या दिवशी सकाळीच शशिकला शिवाजी पोकळे (वय ३७ ) यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील भगिनीवर काळाने घाला घातला आणि तिच्याबरोबरच भावाच्या स्वप्नांवर पाणी फिरले. रक्षाबंधनासाठी भावाकडे जायचे म्हणून बहिण सकाळी लवकर उठून काम आवरत होती. सकाळी साडेसातच्या सुमारास कपडे धुत असताना अचानक तिच्या छातीत दुखू लागले आणि ती जमिनीवर कोसळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, बहिणीचा उपचारापूर्वीच दुर्दैवी अंत झाला. शशिकला यांची बहीण उचाळेवस्ती येथे त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहत आहे. पितृछत्र हरपल्यानंतर आई आणि भाऊ यांच्यासाठी शशिकलाचा मोठा आधार होता.

अतिशय शोकाकुल वातावरणात दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐन तारुण्यात लेक जाताना पाहून आईने फोडलेला हंबरडा, भाऊ, बहीण, पती, दोन मुले यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणाऱ्या आवाजाने उपस्थित जनसमुदाय हेलावून गेला होता.

शशिकला यांचे पती शिवाजी पोकळे हे टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेचे चालक आहेत. अनेक रुग्णांना रात्री अपरात्री वेळेत उपचारासाठी घेऊन जाणारा कर्मचारी अशी त्यांची ओळख आहे. मात्र, त्यांच्यावरच अशी वेळ ओढवल्याने पंचक्रोशीतील नागरिकांबरोबरच आरोग्य खात्यातील डॉक्टर, कर्मचारी यांच्या मधून हळहळ व्यक्त होत आहे.

शिरूर तालुक्यात युवकाला दुचाकीस्वाराने दिली धडक; युवक गंभीर जखमी…

धामारीत किरकोळ वादातून बहिणीला बेदम मारहाण

शिक्रापुरातील बहिण भाऊ एकाच वेळी पोलीस भरती

पुन्हा सैराट! बहिणीला पळवून नेणाऱ्याची भर रस्त्यात कुऱ्हाडीने वार करुन हत्या…

शिरुर तालुक्यातील बहिणीने केली भाऊबिजेला भावाला किडनी दान…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

11 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

20 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago