शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पदभार स्वीकारताच पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाई सुरु केली असुन शिरुर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी तसेच कवठे येमाई येथील अवैध गावठी दारु व्यवसायावर धाड टाकत लाखों रुपयांचा मुद्देमाल जाग्यावर नष्ट केला आहे. बेट भागातील बाळू रुपाजी मुंजाळ (रा.मुंजाळवाडी, कवठे येमाई) हा लपून अवैध गावठी दारु गाळप करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने संजय जगताप यांनी पोलिसांचा फौजफाटा सोबत घेऊन गावठी हातभट्टीवर छापा टाकला. यावेळी 32 बॅरल मध्ये गावठी दारू तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सुमारे 2 लाख रुपयांचे 6 हजार 600 लिटर कच्चे रसायन जप्त करुन पंचासमक्ष जागीच नष्ट करण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय जगताप,पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, सुनील उगले, पोलीस नाईक धनंजय थेऊरकर, विशाल कोथळकर, पोलीस अंमलदार रघुनाथ हाळनोर,पोलीस अंमलदार दीपक पवार, प्रवीण पिठले, सोनू तावरे यांनी केली आहे. तसेच अवैधरित्या लपून गावठी दारुची हातभट्टी उभारुन कच्चे रसायन सापडल्याने पोलीस अंमलदार सोनू तावरे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात सरकार तर्फे फिर्याद देऊन मुंबई दारूबंदी कायदा कलम अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार माणिक मांडगे हे करत आहेत. तसेच या पुढील काळात विशेष पथक स्थापन करुन अशा प्रकारच्या कारवाया कायम सुरुच ठेवल्या जाणार आहेत. तसेच वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर थोड्याच दिवसात MPDA तसेच तडीपारी सारख्या कडक कारवाया केल्या जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले.
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…
आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…