मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती येथे किसान जागृती यात्रेची १६ फेब्रुवारीला जाहीर सभेची तयारी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): देशातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांसाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत देशभर सुरु असलेली किसान जागृती यात्रा सोमवार दि १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे दाखल होणार असुन या यात्रेचे विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना व जनआंदोलनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

देशातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांसाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली असुन यातील मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.

1) एमएसपीला कायदेशीर हमी

संपूर्ण शेतकरी कर्जमाफी

उसाचा एफआरपी दर 6000 रुपये प्रतिटन करणे.

2) जमीन संपादन कायदा २०१३ पुन्हा लागू करणे.

3) पीक विमा योजनेत आमूलाग्र सुधारणा

4) ही किसान जागृती यात्रा संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

या यात्रेचे नेतृत्व राष्ट्रीय संयोजक व ज्येष्ठ शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल (पंजाब) हे करत आहेत. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी कन्याकुमारी येथून प्रारंभ झालेली ही यात्रा १९ मार्च २०२६ रोजी काश्मीर येथे समारोप होणार आहे.

ऐतिहासिक आंदोलनांचा अनुभव…

जगजीत सिंग डल्लेवाल यांनी यापुर्वी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी तीन कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर सलग १३ महिने चाललेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. तसेच २०१८ मध्ये दिल्लीतील रामलीला मैदान येथे अण्णा हजारे यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण केले होते. त्यानंतरही राज्य व केंद्र सरकारकडे मागण्या मान्य करुन घेण्यासाठी त्यांनी सलग १३१ दिवस उपोषण करून संघर्षाची परंपरा कायम ठेवली आहे.

रांजणगावात जाहीर सभेचे आयोजन

यात्रेच्या स्वागतानंतर रांजणगाव गणपती येथील मोरया लॉन्स, मंगल कार्यालय येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत जगजीत सिंग डल्लेवाल शेतकरी, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी प्रादेशिक शेतकरी संघटना, ग्राहक संघटना, भ्रष्टाचारविरोधी संघटना, माहिती अधिकार संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शेतकरी ऐक्याचा संदेश देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकजूट निर्माण करण्यासाठी व शेतकरी हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने ही यात्रा काढण्यात आली आहे.

रांजणगाव गणपती येथे होणारे स्वागत व जाहीर सभा हे शेतकरी चळवळीला नवे बळ देणारे ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.रांजणगाव परिसरातील शेतकरी व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक यात्रेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago