महाराष्ट्र

मंत्रालयात लाचखोरी प्रकरण: मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित मंत्री कार्यालय सील केले आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्री झिरवळ यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, “मंत्रालयात खुलेआम लाचखोरी सुरू असल्याचे समोर येत असेल, तर नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा.”

सपकाळ यांनी आरोप केला की, काँग्रेस सरकारच्या काळात सचिवालयाचे नाव बदलून ‘मंत्रालय’ ठेवण्यात आले होते, जेणेकरून लोकांना सरकार आपले वाटावे. मात्र, सध्याच्या महायुती सरकारच्या काळात मंत्रालयाचे ‘भ्रष्टाचारालय’ झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.

लाच घेताना पकडलेल्या लिपिकाने वरिष्ठांच्या सांगण्यावरूनच रक्कम स्वीकारल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, मंत्री झिरवळ यांनी “या प्रकरणात संबंध आढळल्यास राजीनामा देईन” अशी भूमिका जाहीर केली आहे. मात्र, निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका काँग्रेसने कायम ठेवली आहे.या प्रकरणामुळे भाजपा महायुती सरकार अडचणीत आले असून पुढील काही दिवसांत या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

19 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

22 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

22 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

2 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 दिवस ago