शिरुर (अरुणकुमार मोटे): काही दिवसांपुर्वी एका ट्रव्हल्समध्ये रांजणगाव MIDC पोलिसांना ४ किलो गांजा मिळाला होता. त्यावेळी फक्त स्टेशन डायरीला नोंद घेऊन आर्थिक तडजोड करत ट्रव्हल्सला सोडून देऊन मोठा काळाबाजार केल्याच्या चर्चेला रांजणगाव -कारेगाव परीसरात उधान आले आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. राजंणगाव MIDC परीसरात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असुन तरुण पिढी व्यसनाधिन होऊन वाममार्गाला लागली आहे.
रांजणगाव पोलिसांचे अनेक नवनवीन कारनामे रोज समोर येत असुन या ट्रव्हल्समध्ये गांजा आला कुठून याचा शोध घेऊन गांजाची होणारी तस्करी मुळासकट शोधून काढून खरे आरोपी पकडण्याचे आव्हान रांजणगाव पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.. या प्रकरणाची वेगवेगळ्या चर्चा रंगत असून या पाठीमागचे नेमके गुढ कधी उलगडणार याकडे या परीसरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.याबाबत रांजणगाव MIDC चे पोलिस हवालदार विलास आंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीला नोंद घेतली असून पंचनामे केले आहे. गाडीमध्ये पॅसेजर असल्यामुळे गाडी जप्त केली नाही. फुटेजवरून आरोपीला शोधण्यास टिम पुणे येथे गेली असल्याचे त्यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…