मुख्य बातम्या

रांजणगाव पोलिसांची कारेगाव येथील यश इन चौकात गुटख्यावर कारवाई

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथील यश इन चौकात चारचाकी गाडीत गुटखा विक्रीसाठी आलेल्या एका कार चालक कारवाई दरम्यान पळुन गेला होता. परंतु रांजणगाव पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत कारसह गुटखा ताब्यात घेतला असुन यामध्ये रांजणगाव पोलिसांनी ९ लाखांच्या चारचाकी कारसह ९ हजार रुपयांचा गुटखा पकडला आहे.

 

शेखर भगवान अभंग (वय २५), रा. मंगलमुर्ती शाळेजवळ, रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे असे आरोपीचे नाव असुन याबाबत शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील (DYSP Office) पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश बाबासाहेब झेंडे यांनी रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) येथे फिर्याद दाखल केली आहे.

 

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि ३१ मार्च २०२५ रोजी १०:४५ च्या सुमारास कारेगाव (ता. शिरुर जि. पुणे) गावच्या हद्दीत अहिल्यानगर ते पुणे हायवे रोडच्या कडेला सोपानराव वडेवाले हॉटेलच्या समोर फरार आरोपी हा विना नंबरची नवीन टाटा कंपनीची पंच हि चारचाकी कार घेऊन उभा असल्याची गोपनीय माहिती शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश झेंडे यांना मिळाली. याबाबत त्यांनी रांजणगाव पोलिसांना कळवले. त्यानंतर प्रकाश झेंडे आणि रांजणगाव पोलिस हे सदर चारचाकी गाडीजवळ कारवाई जात असताना आरोपीने गाडी जाग्यावरच सोडुन पळ काढला.

 

त्यानंतर पोलिसांनी ९ लाखांच्या टाटा कंपनीच्या पंच मॉडेलच्या विना नंबरची चारचाकी कार तसेच ९ हजारांच्या गुटख्यासह एकुण ९ लाख ९ हजारांचा माल जप्त केला असुन कारवाई दरम्यान पळुन गेलेला आरोपी शेखर भगवान अभंग याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे (Ranjangaon MIDC Police Steshan) पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश आगलावे हे पुढील तपास करत आहेत.

त्या बहुचर्चित खुण प्रकरणातील दोषी आधिकारी, कर्मचाऱ्यांवर कधी होणार कारवाई ?

त्या बहुचर्चित खुनाचा व्हिसेराच तब्बल आठ महिन्याने प्रयोगशाळेत जमा; वरिष्ठांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago