Shikrapur Police Station

त्या बहुचर्चित खुनाचा व्हिसेराच तब्बल आठ महिन्याने प्रयोगशाळेत जमा; वरिष्ठांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील त्या बहुचर्चित खुन प्रकरणातील एकुण पाच आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होताच खुनातील वेगवेगळे खुलासे होऊ लागले आहेत. खुन झालेला व्यक्ती माधव करडे याचा खुन ११ मार्च २०२४ मध्ये झाला होता. त्याच वेळी वैदयकीय अधिकारी यांनी त्याचा व्हिसेरा काढुन ठेवला होता. तो व्हिसेरा शिक्रापुर पोलीसांनी तब्बल आठ महिने स्वतः जवळ ठेवला होता.

 

परंतु ‘या’ खुनाची चर्चा मिडीयात होवु लागल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर यांच्या परवानगीने तो रासायनिक प्रयोगशाळेमध्ये आठ महिन्याने जमा करण्यात आल्याची माहीती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. विधितज्ञांच्या व वैदयकिय आधिकाऱ्यांच्या मते मयताचा व्हिसेरा तात्काळ तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये जमा करणे आवश्यक असते अन्यथा त्यामधील उपलब्ध कन्टेन्ट नष्ट होतात व त्याचा परीणाम तपासणी अहवालावर होवु शकतो.

 

तसेच या प्रकरणी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांच्याशी आमच्या प्रतिनिधिने चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, हि बाब अत्यंत गंभीर आहे. यामध्ये पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व तपासी अधिकारी हे जर दोषी आढळुन आले. तर त्यांच्यावर आरोपीना सहाय्य केले व गुन्हयातील पुरावा नष्ट करण्यास मदत केली याबाबत त्यांची विभागीय चौकशी होवुन त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो.

 

या खुन प्रकरणात गुन्हा दाखल होवुन दोन महिने होवुन सुद्धा यामध्ये पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी आतापर्यत कोणात्याही दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई केली नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांनी जिल्ह्यातील व्हिसेरा उशीरा जमा करणाऱ्या पोलीसांवर यापुर्वी तात्काळ कारवाई केली आहे. परंतु या खुना सारख्या गंभीर प्रकरणात पुणे पोलिस अधिक्षक कधी कारवाई करतील याकडे सर्व जिल्हयातील पोलीसांचे व नागरीकांचे लक्ष लागुन राहिलेले आहे.

(क्रमश;) 

त्या बहुचर्चित खुण प्रकरणातील दोषी आधिकारी, कर्मचाऱ्यांवर कधी होणार कारवाई…?