मुख्य बातम्या

शिरुरच्या ७ जिल्हा परिषद गट तसेच १४ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी आज दि १३ ऑक्टोबर २०२५ आरक्षण सोडत उत्साहात पार पडली. शिरुर तहसिल कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत प्रांताधिकारी विठ्ठल जोशी व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत चिठ्ठी पद्धतीने ही सोडत घेण्यात आली. विशेष म्हणजे या वेळी नागरिक व इच्छुक प्रतिनिधींची उपस्थिती अत्यल्प होती. ज्यामुळे या सोडतीबाबत “उदासीनतेचे” वातावरण पाहायला मिळाले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी शिरुर तालुक्यातील स्वयंप्रकाश फरगडे या शाळकरी मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. पारदर्शक आणि शांत वातावरणात सोडत प्रक्रिया पूर्ण झाली. या सोडतीनुसार २०२५ च्या नव्या लोकसंख्या गणनेनुसार तालुक्यातील अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गाचे प्रमाण विचारात घेऊन आरक्षण निश्चित करण्यात आले.

अनुसूचित जातींची लोकसंख्या सर्वाधिक वडगाव रासाई गणात असल्याने त्या गणाला अनुसूचित जातीचे आरक्षण मिळाले आहे. तर, तालुक्यात अनुसूचित जमातीचे प्रमाण कमी असल्याने या वेळी अनुसूचित जमातीसाठी कोणतेही आरक्षण निघालेले नाही. ओबीसी प्रवर्गासाठी एकूण तीन जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यापैकी दोन जागा ओबीसी महिलांसाठी व एक जागा ओबीसी सर्वसाधारणसाठी राखण्यात आली आहे. उरलेल्या दहा गणांमधून पाच गण सर्वसाधारण महिलांसाठी आणि पाच गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत.

 

पुणे परिषद गटनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे 

न्हावरे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित गट)

मांडवगण फराटा (नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आरक्षित गट)

तळेगाव ढमढेरे, शिक्रापुर, रांजणगाव गणपती (सर्वसाधारण प्रवर्ग, महिला आरक्षित गट)

कवठे येमाई, पाबळ (सर्वसाधारण)

पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे 

१) वडगाव रासाई (अनुसूचित जाती)

२) मांडवगण फराटा (ओबीसी महिला)

३) शिरूर ग्रामीण (ओबीसी महिला)

४) न्हावरे (सर्वसाधारण)

५) पाबळ (ओबीसी सर्वसाधारण)

६) केंदूर (सर्वसाधारण महिला)

७) कवठे यमाई (सर्वसाधारण महिला)

८) टाकळी हाजी (ओबीसी महिला)

९) तळेगाव ढमढेरे (सर्वसाधारण महिला)

१०) रांजणगाव सांडस (सर्वसाधारण)

११) शिक्रापुर (सर्वसाधारण)

१२) सणसवाडी (सर्वसाधारण महिला)

१३) रांजणगाव गणपती (सर्वसाधारण)

१४) कारेगाव (सर्वसाधारण)

या सोडतीच्या निमित्ताने आरक्षणाची प्रक्रिया पारदर्शक रितीने पार पडल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले, मात्र इच्छुक उमेदवार व सामान्य नागरिकांनी घेतलेली ‘उदासीन भूमिका’ लक्षवेधी ठरली. पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सोडत आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम करेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Video; जीवंतपणी आशा तुटल्या, मृत्यूनंतरही उजेड नाही ‘दत्तक’ गावातील स्मशानभुमीची दुरावस्था

Video; घोडनदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर, चिंचणी–बोरी ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! ‘आपले सरकार’ निवडीच्या मूल्यांकनामध्ये मनमानी; अनेकांच्या तक्रारी…

मांडवगण फराटा (संपत कारकुड) : शिरूर तालुक्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' निवडीत शैक्षणिक अर्हता जाहीरनाम्यातील…

2 तास ago

गुन्हेगाराचा धर्म पाहू नका, गुन्हा पाहा! भाजपचे दुहेरी निकष; सचिन सावंत यांचा हल्लाबोल

‘मुस्लिम आरोपी टाइम बॉम्ब, तर इतर आरोपी फुलबाजा का?’; महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले मुंबई: गुन्हेगारीला कोणताही…

17 तास ago

विधानपरिषदेतील सहा वर्षांच्या कामाचा लेखाजोखा आता पुस्तकबद्ध

राज्यपालांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन मुंबई: विधानपरिषदेत मांडलेले प्रश्न, शासनाची उत्तरे आणि…

21 तास ago

लोकप्रतिनिधींच्या कामाचा दस्तऐवज समाजासाठी दिशादर्शक ठरेल; एकनाथ शिंदे

मुंबई: विधानपरिषदेतील कामकाज, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात झालेला संघर्ष यांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडणाऱ्या…

21 तास ago

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीसाठी स्वतंत्र यंत्रणा; कमी बजेटच्या चित्रपटांना मिळणार नवी संधी

इफ्फीतील परिसंवादात सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची महत्त्वपूर्ण घोषणा; सात दिवसांत चित्रीकरण…

21 तास ago

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…

1 दिवस ago