मुख्य बातम्या

घोड धरणात वाळू माफियांचा धुमाकूळ; महसूल आणि पोलिस प्रशासन हतबल…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरण परिसरात गेली दोन वर्षे रात्रीच्या अंधारात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. धरणात चालणाऱ्या यांत्रिक बोटिंचा आवाज, वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांची रात्रीची वर्दळ आणि मध्यरात्री पासुन पहाटेपर्यंत सुरु असलेली वाळूची बेकायदेशीर वाहतूक हे चित्र चिंचणी, गुनाट आणि निमोणे या गावात आता रोजचेच झाले आहे. मात्र प्रश्न असा आहे की, प्रशासनाला हे दिसत नाही का… की दिसूनही दुर्लक्ष केले जात आहे…?

पाच कारवाया, पण तरीही वाळू उपसा मात्र जोमात…

शिरुर पोलीस आणि शिरुर तसेच श्रीगोंदा महसूल विभागाने आत्तापर्यंत घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशावर पाच वेळा कारवाई करत जिलेटिनच्या साह्याने बोटी उडविल्या आहेत. पण काही दिवसांनी बेकायदेशीर वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असल्यामुळे या कारवाया फक्त कागदावरच आहेत का..? तसेच या वाळू माफियांना एवढे बळ कुठून मिळते…? तसेच राजकीय पुढाऱ्यांचा या वाळूमाफियांना पाठिंबा असल्याशिवाय हे शक्यच नाही, अशी सगळीकडे दबक्या आवाजात सध्या चर्चा सुरु आहे.

घोड धरणात रात्रीच्या वेळेस ‘राज्य’ कोणाच…?

रोज सूर्यास्तानंतर घोड धरण परिसरात यांत्रिक बोटिंच्या साह्याने नदीपात्रात बेसुमार वाळू उपसा सुरु होतो. चिंचणी, येथील गायरानातुन वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची अक्षरशः रांग लागते. हे सर्व प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असताना पोलिसांची गस्त नेमकी कुठे असते, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

पर्यावरणाचा ‘विध्वंस’ तरीही प्रशासन मौनच…?

घोड धरणातील अनियंत्रित वाळू उपशामुळे पाणीसाठ्यावर मोठा परिणाम होणार असुन नदीपात्र खोल जाऊन भूजलपातळीत घट होऊन शेती व पिण्याच्या पाण्याला धोका निर्माण झाला आहे. घोड धरणातील या अवैध वाळू उपशामुळे जैवविविधतेचे नुकसान होत आहे. हे सर्व धोके डोळ्यासमोर असूनही संबंधित यंत्रणा ठोस पावले उचलताना दिसत नाही. त्यामुळे काही ठराविक लोकांच्या आर्थिक फायद्यासाठी प्रशासन पर्यावरणाचा बळी देत असल्याचा आरोपही पर्यावरण प्रेमीनीं केला आहे.

वाळू माफीयांचा कायमचा ‘बंदोबस्त’ करा…

शिरुर तसेच श्रीगोंदा महसूल विभागाने पाच वेळा कारवाई करुनही वाळू माफिया काही थांबायचे नाव घेत नाहीत. त्यामुळे वाळू माफियांवर गुन्हे दाखल करुन त्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करा,” अशी मागणी आता उघडपणे होत आहे. काही ग्रामस्थांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

प्रशासनाची ‘विश्वासार्हता’ धोक्यात कायद्याचा ‘धाक’ संपला आहे का…?

घोड धरणातील पाच वेळा कारवाई होऊनही जर उपसा सुरुच असेल, तर ही प्रशासनाचे अपयश नाही का…? घोड धरणातील वाळू माफियांचा हा धुमाकूळ केवळ बेकायदेशीर धंदा नाही तर तो प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि प्रामाणिकपणावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण आहे. आता जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर, निर्णायक आणि कायमस्वरुपी कारवाई करणार का…? याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.

(क्रमशः)

ZP निवडणूक काळात घोड धरणात वाळू माफिया सक्रिय अन प्रशासन मात्र निष्क्रिय…?

Video; महसुल, पोलिस आणि सरपंचाचा बसलाय मेळ त्यामुळे घोड धरणात चाललाय वाळू उपशाचा खेळ

Video; घोड धरणात वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट पुन्हा उध्वस्त, तरीही वाळू उपसा सुरुच

व्हिडीओ:- घोड धरणात रात्रीस वाळू उपशाचा चालतोय खेळ, प्रशासन सुस्त आणि वाळू चोर मस्त

घोड धरणातील अवैध वाळू उपशावर महसुल आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

16 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

19 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

19 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

1 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 दिवस ago