मुख्य बातम्या

शिक्रापूर पोलिसांचे आव्हान, डीजे व डॉल्बीला परवानगी नाही, पारंपरिक पद्धतीने साजरा करा गणेश विसर्जन

शिक्रापूर (ओमकार भोरडे): गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलिस स्टेशनने हद्दीतील सर्व गणेश मंडळांना महत्त्वाची सूचना दिली आहे. उत्सव काळात डीजे, डॉल्बी, लेझर लाईट आदींवर संपूर्ण बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

गावातील गणेशोत्सव शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने पार पडावा यासाठी पोलिसांनी विशेष आवाहन केले आहे. डीजे, डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे होणारे ध्वनीप्रदूषण तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले की, “गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा सोहळा आहे. मात्र यातून कुणालाही त्रास होऊ नये म्हणून पारंपरिक वाद्यांचा वापर करूनच उत्सव साजरा करावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही.”शिक्रापूर पोलिसांनी सर्व गणेश मंडळांना दिलेल्या सूचना काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले असून, नागरिकांमध्येही या निर्णयाचे स्वागत होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

13 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

21 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago