vishal-kale-shirur
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे याचा मृत्यू झाला आहे. केदार चंद्रकांत झाडगे आणि उमेश अनिल जगदाळे हे दोन युवक जखमी झाले आहेत. झाडगे याच्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार चालू आहेत. जगदाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून सनी संजय यादव आणि विशाल पन्दी यांच्यासह इतर चार ते पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल काळे हा केदार झाडगे आणि उमेश जगदाळे यांच्यासोबत काही कामानिमित्त बाहेर गेला होता. गाडी नंबर एमएम 12 एक्सक्यु 5704 या कारमधून तिघंही आपलं काम करून निघाले होते. त्यावेळी पाऊस सुरू झाला होता. जोराचा पाऊस सुरू असताना त्यानंतर समोरून आलेल्या एमएच 14 एलए 1128 या कारने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. धडक दिल्यानंतर सगळे कारमधून उतरले आणि काळे यांच्या साथिदारांवर बेछुट गोळीबार सुरू झाला.
आपल्यावर हल्ला झाल्याचे लक्षात येताच काळे आणि त्याचा मित्र जगदाळे याने पळ काढला. समोर दिसणाऱ्या ढाब्याच्या दिशेने दोघंही पळत सुटले. मागून आरोपी त्यांचा पाठलाग करत होते. हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. उमेश जगदाळे हा ढाब्याच्या आडोशाला लपून बसला आणि मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. विशाल काळे याला यावेळी गोळी लागली अन् तो रस्त्यावरच पडला. त्यावेळी मागून सनी यादव आणि त्याचा सहकारी दुचाकीवरून त्याचा पाठलाग करत होते. दोघांनी विशाल काळे याला धरलं अन् त्याच्या डोक्यात दगड घातला.
दरम्यान, विशाल काळे याला बेदम मारहाण केल्यानंतर त्यांनी आलेल्या दुचाकीवरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….
शिरूर तालुक्यात पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग; गोळीबाराची घटना…
Video! शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात हवेत गोळीबार; गुन्हा दाखल…
शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून केले जेरबंद…
…अन्यथा शिरुर तालक्याचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…