मुख्य बातम्या

शिरुर बाजार समिती निवडणुक; अशोक पवारांवर टिका करणाऱ्या माऊली कटकेंनी दिड वर्षात काय केले…?

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालु असुन एका बैठकीदरम्यान शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी अशोक पवारांवर टिका करताना पवारांचा नेमका पक्ष कोणता…?” अशी टिका केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्या वक्तव्यामुळे माऊली कटके यांच्यावर शिरुर तालुक्यातील नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर टिकेची झोड उठविली आहे. 

आमदार कटके यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ आणि त्यावरील चर्चा व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांच्या राजकीय भुमिकेवर आणि कामगिरीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडियावरील अनेक पोस्टमध्ये असा आरोप केला जात आहे की, कटके यांचे राजकारण केवळ निवडणुकांपुरतेच मर्यादित असते. निवडणुका संपल्या की त्यांचा सर्वसामान्य जनतेशी संपर्कही नसतो, अशी टिका नेटकऱ्यांकडून होत आहे.

आमदार कटकेनां नेटकऱ्यांनी केल ट्रोल…

शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या चासकमान आवर्तनाच्या महत्त्वाच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्यात कटके अपयशी ठरले, असा आरोपही अनेक नेटकऱ्यांनी केला आहे. या विषयावर कटके यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची खंत यावेळी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. तसेच “गेल्या एक ते दिड वर्षांत तालुक्यासाठी नेमकी कोणती विकासकामे केली…?”, “निवडणुकीच्या वेळी सर्वसामान्य जनतेला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले…?”, “तालुक्यातील रस्ते, पाणी, शेती आणि रोजगाराच्या प्रश्नांवर काय काम केले…?” अशा प्रश्नांचा भडिमार नेटकऱ्यांनी आमदार कटके यांच्यावर केला आहे. 

आमदारसाहेब रिल मधून रियल मध्ये जमिनीवर या…

राजकीय निरीक्षकांच्या मते, एका वक्तव्यामुळे सुरु झालेली चर्चा आता थेट कामगिरी विरुद्ध प्रसिद्धी या मुद्द्यावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फक्त तालुक्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अन आता थेट बाजार समितीच्या निवडणुकित रिल मध्ये दिसणारे आणि विकासकामांची फक्त सोशल मिडियावर जाहिरात करणाऱ्या आमदार माऊली कटके यांनी रियल लाईफमध्ये थेट जमिनीवर उतरुन सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणुन घ्याव्यात अशी टिका नेटकरी करत आहेत.

(क्रमश:) 

शिक्रापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाचालकांकडून प्रवाशाला बेदम मारहाण करत जबरी चोरी

शिरुर; शिंदोडीत विटभट्ट्यांसाठी बेकायदेशीर मातीउपसा; महसूल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

8 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

9 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

9 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

10 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

10 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

10 तास ago