मुख्य बातम्या

शिरुरमध्ये आजी-माजी आमदार मतदान केंद्रावरती भिडले…

शिरुर (तेजस फडके) शिरुरमध्ये आजी-माजी आमदार मतदान केंद्रावरती एकमेकांना भिडले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिरुर शहरातील मतदान केंद्रात जाण्यावरुन ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके व माजी आमदार अशोक पवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. आडत बाजारातील उर्दू शाळेतील मतदान केंद्राबाहेर सायंकाळी हि बाचाबाची झाली. या गोंधळानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविल्यानंतर शांततेचे आवाहन करीत हे आजी-माजी आमदार निघून गेले.

आमदार माऊली कटके यांनी शहरातील अनेक मतदान केंद्रांना भेट देत परिस्थितीची तसेच मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी ते काही मतदान केंद्रात जाऊन माहिती घेत असल्याचे समजताच व ते उर्दू शाळेजवळील मतदान केंद्रात गेल्याचे आपल्या कार्यकर्त्यांकडून समजताच अशोक पवार यांनी या मतदान केंद्राकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांच्यासमवेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते.

आमदार कटके हे मतदान केंद्रातून बाहेर येताच माजी आमदार पवार यांनी त्यांना या कृत्याचा जाब विचारला. तुम्हाला कायद्याने मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार नसल्याचे सांगत आपण एक लोकप्रतिनिधी असून, तुम्हाला हे बेकायदा कृत्य करणे पटते का…? प्रत्येक मतदान केंद्रात जावून पाहणी करणे योग्य आहे का…? असा सवाल केला. त्यावर कटके यांनी बाजूला या यावर आपण चर्चा करु, असे म्हणताच पवार यांनी तुम्ही आत का गेला याचे उत्तर द्या…? असा तगादा लावत या घटनेचे व्हिडिओ चित्रण करा, असे कार्यकर्त्यांना सांगितले. मतदान केंद्राधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांना बोलवा, असे ते म्हटले त्यावर तुम्ही चिडू नका, रागावू नका, हायपर होऊ नका, असे आमदार कटके म्हणाले. त्यावर आपण आमदार आहात, कायदा पाळा, नीट वागा असा सल्ला दिल्याने आमदार कटके काहीसे संतप्त झाले. पराभव दिसायला लागल्याने तुमच्या पायाखालची वाळू सरकली का काय…? सीसीटीव्ही चित्रण तपासा असे म्हणत ते निघून गेले. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला दहा गुन्ह्यांचा आरोपी! पुण्यातून अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ४ लाख २५…

12 तास ago

शिरूर पोलिसांची दिपावलीच्या पार्श्वभुमीवर सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त…

शिरूर (तेजस फडके) : आगामी दिपावळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरुर शहरातील नागरिक, व्यापारी आणि सराफ व्यावसायिकांच्या…

12 तास ago

खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाचे आकांडतांडव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवू! सक्तीच्या कर्जवसुलीवर एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…

1 दिवस ago

दुष्काळ निवारणासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली खपवून घेणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…

1 दिवस ago

‘स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत!’; सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…

1 दिवस ago