शिरूर तालुका

Video: रांजणगाव MIDC परिसरात शिरला बिबट्या…

शिरूर (तेजस फडके): रांजणगाव MIDC परिसरात पुन्हा एकदा वन्य प्राण्यांच्या हालचालींमुळे कामगारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. औद्योगिक वसाहतीतील परिसरात बिबट्याने अनाहूत प्रवेश केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबट्याच्या वावरामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी कंपनीचा परिसर बिबट्याची शोध मोहीम सुरू केली आणि कामगारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. वनविभागातील पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील पगमार्क तसेच हालचालींचा तपास सुरू आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या दर्शनाच्या घटनांत वाढ झाली असून, कामगारांचे जीवित सुरक्षित राहावे यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी विशेषत: सुरक्षा वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे.

वनविभागाने कामगारांना गटाने फिरणे, आडवाटेने जाणे टाळणे व संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन केले आहे. परिसरात पिंजरे लावण्याबाबतही विचार सुरू आहे. लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील उत्पादन व कामकाज दोन्ही धोक्यात येऊ शकते, अशीही भीती व्यक्त होत आहे.

शिरूर तालुक्यात बिबट्यांसाठी कृत्रिम जंगल केले जाणार विकसीत; कोठे पाहा…

शिरुर तालुक्यात दोन जर्सी कालवडीवर बिबट्याचा हल्ला एक ठार, दुसरी गंभीर जखमी…

पुणे विमानतळावर प्रवाशांची गर्दी अन् अचानक आला बिबट्या…

Video; शिरुर; वनमंत्री तालुक्यात असतानाच बिबट्याचा दिवसाढवळ्या १० शेळ्यांवर हल्ला

चिंताजनक! बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीला नेलं उचलून…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

6 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago