मुख्य बातम्या

“शिरुर तालुका डॉट कॉम” च्या बातमीचा दणका…पाटबंधारे विभागाकडून तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील म्हसे येथे मीना कालव्याच्या कॅनॉलचे पाणी रविवार(दि 23) तुंबले गेल्याने “मीना कालवा फुटून शेतात पाणी, शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे नुकसान” झाल्याची बातमी “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध करताच पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी आर जी हांडे, शाखाधिकारी एस टी दाते, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष रोहिदास मुसळे आणि मीना कालवा टाकळी हाजी कार्यालयाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी केली आहे.

रविवार (दि 23) रोजी मिना कालव्याचा कॅनॉल फुटून शेतात पाणी घुसल्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली आहे. उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे, पंचनामा करण्यासाठी तलाठी व कृषी सहाय्यक आज सोमवार (दि 24) रोजी उपलब्ध नसल्यामुळे मंगळवारी (दि.२५) रोजी पंचनामा केला जाईल असे टाकळी हाजी कार्यालयाचे शाखाधिकारी एस. टी. दाते यांनी सांगितले आहे. आम्हाला कांद्याची नुकसान भरपाई मिळावी तसेच कॅनॉलची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी येथील बाधित शेतकरी निळू चोरे यांनी केली आहे.

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

8 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

12 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

12 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

12 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

12 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

13 तास ago