hospital building vector illustration in flat style design
रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरूर तालुक्यात पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याचे उल्लंघन करून मोबाईल ॲपच्या सहाय्याने गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी बीएएमएस शिक्षण घेतलेल्या डॉ. आकाश सुभाष मलगुंडे याच्यासह एजंटवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ढोकसांगवी अंतर्गत असलेल्या पाचंगे वस्ती येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याची गोपनीय माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रशासनाने सापळा रचला. वाघोली पोलिस ठाण्यातील लेडी कॉन्स्टेबल प्रतीक्षा पानसरे यांनी डमी रुग्ण बनून या हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत गेलेल्या पथकाने या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला.
कारवाईत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, गर्भलिंग निदानासाठी कोणत्याही मोठ्या मशीनऐवजी मोबाईल ॲपचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. एजंट नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली) याच्यामार्फत हे रॅकेट चालवले जात होते. मोबाईल ॲपच्या मदतीने अनेक रुग्णांची तपासणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही पद्धत पाहून तपास पथकही अवाक झाले.
तपासणीदरम्यान क्लिनिकमध्ये गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर गोळ्यांचा साठा सापडला. पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणारी कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी संबंधित क्लिनिकचे सर्व साहित्य सील केले आहे. ही कारवाई आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले आणि शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन धस यांच्या उपस्थितीत करण्यात आली. क्राईम ब्रँच युनिट-७ चे डीसीपी राजेंद्र मुळीक व वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या पथकाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.
“गर्भलिंग निदान करणे आणि करून घेणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कामात सामील असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही,” असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती तात्काळ पोलिस किंवा आरोग्य विभागाला देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
IVF केंद्रांवर लगाम घालण्यासाठी जिल्हानिहाय समितीची मागणी; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
शिरूर तालुक्यात भिसीच्या नावाखाली अनेक पोलिसांनाच गंडा; लाखो रुपयांचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात
राजकीय भूकंप! थेट निवडून आलेल्या सरपंचांना ग्रामस्थांचा झटका
शिरूर! रांजणगाव गणपती परिसरात स्फोटाच्या धक्क्याने घरांना तडे; पाहा Video…
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…
शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…