Shirur Police Station
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत सतरा कमान पुलाजवळ निवडणुकी करिता नाकेबंदी करणाऱ्या शिरूर पोलिस स्टेशनच्या पथकाला तपसणी करीत असताना एम जी ग्लोस्टर गाडी मध्ये ५१ लाख १६ हजार रुपये रक्कम मिळून आले आहेत, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीमुळे शिरूर 17 कमान पुलाजवळ 10 एप्रिल 2024 रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस पथक महिला पोलिस अंमलदार भाग्यश्री जाधव, पोलिस कॉन्स्टेबल भागवत गरकळ, पोलिस शिपाई व्ही बी सुंबे, पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण पिठले नाकाबंदी करीत असताना नगरच्या दिशेहून पुण्याकडे जाणाऱ्या एम.जी. ग्लोस्टर गाडी नं. एम.एच. २३ बी.सी. ०१११ ही गाडी तपासणी केली असता तिच्या मध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम आढळून आली. पोलिस पथकाने पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी ही माहिती शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना कळविली
तहसीलदार यांच्या आदेशानुसार शिरूर येथील निवडणुकी करीता नेमलेले एफएसटी टीम नं. १ यांचे प्रमुख गुलाब खरबस, सहायक एस.पी. पादळे यांनी दोन पंचासमक्ष टिम मधील फोटोग्राफर अजिक्य जगताप यांचे मार्फत शुटींग करून सदरची समक्ष मोजली असता ५१ लाख १६ हजार रूपये भरली आहे. ही रक्कम कोणाची व कशासाठी आणली होती याबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. याबाबत ही रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात देणारा असून ते याबाबतची चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिरूर तालुक्यात भरदिवसा महिलेची सोन्याची पोत हिसकावली…
शिरूर लोकसभेतील मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द; कारण…
शिरूर तालुक्यात निवडणुकीच्या धामधुमीत चारा, पाणीटंचाईकडे दुर्लक्ष…
शिरुर तालुक्यातील दुचाकी चोर निघाला यवतमाळ जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी
रांजणगाव MIDC परिसरात कोयत्याचा धाक दाखवुन मोबाईल चोरी करणा-या तीन सराईत आरोपींना अटक
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…