मुख्य बातम्या

शिरूरमधील ‘त्या’ बडया एच.पी गॅसवर कधी होणार कारवाई?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात गॅस टाक्यांच्या रिफिलींगचा काळाबाजार उघड झाला असून, या रिफिलींगसाठी घरगुती गॅस पुरवणाऱ्या एस.डी. दुगड एच.पी एजन्सीवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील योग्य ती कारवाई झाली नसून, अजूनही सदरचा एजन्सीधारक गोडावून मधून खुलेआम काळया बाजारात घरगुती गॅसची विक्री करत आहे.

रांजणगावात पोलिस स्टेशनसमोरच हाकेच्या अंतरावर रिफीलींगवाले घरगुती टाकीतून ४ किलोच्या टाकीत दिवसाढवळ्या पुणे-नगर रोडवर हा व्यवसाय करत आहेत. आमचे हप्ते चालू असून आमचे कोणीही वाकडे करु शकत नाही, अशा वल्गना करत आहेत. शिरुर, रांजणगाव, न्हावरे, सोने सांगवी, ढोक सांगवी, कारेगाव, कोरेगाव भीमा येथे रिफिलींग व्यवसाय मोठया प्रमाणावर होत आहे.

पुरवठा विभाग व पोलिस प्रशासन यांना अजूनही जाग आली नसून, अर्थपुर्ण व्यवहारामुळे डोळेझाक करत असल्याची नागरीक चर्चा करत आहेत. पुरवठा विभाग या एजन्सीधारकाचे नदीच्या पलीकडे अहमदनगर जिल्हयात अनाधिकृतरित्या असलेल्या गोडावून वर कारवाई करणार का? या एजन्सीवर पुढील कारवाई टाळण्यासाठी मोठी आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा शिरूर शहरात होत आहे. संबंधित एजन्सीवर तातडीने तपास करुन आधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास योग्य त्या न्यायालयात धाव घेणार असल्याचे नागरीकांनी सांगितले आहे.

unique international school

शिरूर तालुक्यात अवैधरीत्या गॅस रिफिलींगचा व्यवसाय जोरात सुरू…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

8 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago