मुख्य बातम्या

रांजणगाव परिसरात ‘ड्रग्ज मुक्त गाव’ मोहिमेला वेग; कारेगाव येथे जनजागृती कार्यक्रम…

रांजणगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीत कारेगाव येथील श्री कारेश्वर मंदिर सभागृहात आज सकाळी 10.30 ते 12.00 या वेळेत ‘ड्रग्ज मुक्त गाव’ या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक महादेव वागमोडे यांनी केले.

यावेळी ग्रामस्थांना अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व आर्थिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तरुण पिढीला या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना व जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पोलिसांकडून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच या मोहिमेत लोकसहभाग अत्यंत गरजेचा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक साबळे यांनी केले. त्यांनी ड्रग्ज व्यसनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांवर सविस्तर माहिती दिली. यानंतर पोलीस निरीक्षक महादेव वागमोडे यांनी उपस्थितांना अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन यासंदर्भात कोणतीही माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले. “ड्रग्ज मुक्त गाव” साकारण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन समूळ उच्चाटनासाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित ग्रामस्थांनी ‘ड्रग्ज मुक्त गाव’ साठी शपथ घेतली. प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नवले यांनी आभार प्रदर्शन केले.
या वेळी पंचायत समितीचे विश्वास आबा कोहकडे (सभापती), अ‍ॅड. हिरामण गावडे, डॉ. गावडे, डॉ. संदीप बच्छाव, डॉ. डफळ, ग्रामविकास अधिकारी किसन बिबे, पृथ्वीराज नवले, हणमंत शेवाळे यांच्यासह सरपंच, सदस्य, डॉक्टर, मेडिकल व हॉटेल व्यावसायिक, दक्षता समिती सदस्य, जेष्ठ नागरिक व सुमारे 70 ते 80 ग्रामस्थ उपस्थित होते.

शिरुरमध्ये ‘एटीएस’ चा सर्जिकल स्ट्राईक; ‘एमडी’ ड्रग्ज विक्रेते रंगेहाथ पकडले, लाखोंचा साठा जप्त

शिरूर ड्रग्ज प्रकरण! पोलिस हवालदार गुजर व शिंदे बंधूंचे काळ्या धंद्याचे जाळे होणार उघड…

शिरूरमध्ये एमडी ड्रग्जविरोधात धडक कारवाई; कोट्यावधींच्या मुद्देमालासाह आरोपीला अटक…

मोठी बातमी! शिरुर तालुक्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; १७४ किलो ड्रग्ज जप्त

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

7 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

7 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

12 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

17 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

1 दिवस ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 दिवस ago