मुख्य बातम्या

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण अन् खंडणी…

शिरूर (तेजस फडके): आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र व रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार (वय २६) यांचे अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून अशोक पवार उभे राहिले आहेत. वडिलांसाठी ऋषीराज पवार हे मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे प्रचार करीत होते. यावेळी एका टोळक्याने त्यांचे अपहरण केले व दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी विवस्त्र करून मारहाण केली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान, हनी ट्रॅपमधून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिकृत माहिती समोर येईल. पण, या घटनेमुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती पुढीलप्रमाणेः
ऋषिराज पवार याला मारहाण करत विवस्त्र करुन तिथं एका महिलेला आणून व्हिडीओ तयार करुन यासाठी 10 कोटी मिळणार असल्याचे भाऊ कोळपेने सांगितल्याची माहिती अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. अपहरण करण्यात आलेला ऋषिराज पवार सध्या शिरूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेला आहे. सरोदे यांच्या पत्रकार परिषदेला अशोक पवार यांची मुलगी देखील उपस्थित होती.

ऋषिराज पवार यांनी सांगितले की, भाऊ कोळपे हा दिवसभर आमच्या प्रचारात फिरला. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याला माझ्या गाडीत बसवले. आमची गाडी मांडवगण वडगाव पर्यंत नेली असता तिथून पुढं चारचाकी गाडी जाणार नाही असे सांगितले. तिथं कोळपेच्या मित्रांच्या दोन दुचाकी आलेल्या होत्या. कच्च्या रस्त्यातून बंगल्यापर्यंत दुचाकी नेण्यात आल्या. बंगल्यात नेण्यात आलं, तिथं रुममध्ये बोलावण्यात आले. भाऊ कोळपे आणि त्यांच्या दोन मित्रांनी दरवाजा बंद केला. एक बेड होता, तिथं बसवलं, हात पाय पकडले दोघांनी, त्यांच्यापैकी एकानं शर्टची बटणं उघडायला सुरुवात केली. मी त्याला विरोध केल्यानंतर धक्काबुक्की करायला लागले. पैशासाठी करत असाल तर करु असे सांगितले. पण, तिथं पडलेलं कापड घेतलं, माझ्या तोंडावर दाबलं, गळा दाबला, मारुन टाकण्याची भीती घातली. यानंतर कापड काढून त्यांनी पिशवीतून एक दोरी काढून दाखवली. त्यांनी आम्हाला व्हिडीओ हवाय असे सांगितले. त्यासाठी 10 कोटी रुपयांची ऑफर आल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या जीवाला घाबरुन अडचण आणणार नाही हे सांगितले. त्यांनी माझे कपडे काढले, चौथा माणूस होता त्यांनी एक बाई आणली होती. दरवाजा उघडल्यावर बाई आत घेतली. इतर दोघे बाहेर गेले. भाऊ कोळपे याने मोबाईलचा कॅमेरा बाहेर काढला, महिलेला बेडवर झोपण्यास त्याने सांगितलं. तो व्हिडीओ घेत होता. भाऊ कोळपे याने फोटो, व्हिडीओ काढले, व्हिडीओत तो सूचना देतोय, हे रेकॉर्ड झालंय. त्यानंतर महिलेला बाहेर काढल्यानतंर इतर दोघे आत आले.’

पुण्यातून या व्हिडीओसाठी समोरच्या पार्टीकडून 10 कोटी रुपयांची ऑफर आल्याचे भाऊ कोळपे आणि इतरांनी सांगितल्याचे ऋषिराज पवारने म्हटले आहे. बाईक वरुन जात असताना मित्रांना मेसेज करुन ठेवले होते, हा आला की त्याला पकडा असे सांगितलं होते. जसा भाऊ कोळपे आला तसा त्याला धरण्यात आले. आम्ही पकडून त्याला मित्राच्या घरात कोंडून ठेवले, असे ऋषिराज पवार यानं म्हटले आहे.

असीम सरोदे म्हणाले, ‘शिरूर-हवेली मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक पवार हे उमेदवार असून आरोप प्रत्यारोप होत असतात. अशोक पवार आमदार असून त्यांच्या मुलावर जो प्रसंग झाला असून तो अत्यंत वाईट आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. हे कोणी केलं याबाबत तपास सुरू आहे. आमदार अशोक पवार हे देखील टेन्शन मध्ये आहेत.’ दरम्यान, अशोक पवार यांची मुलगी आम्रपाली पवार हिने आज घडलेल्या प्रकारानं कुटुंबाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले आहे.

शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवल्याने कुटुंबाला, ‘घोडगंगा’ला त्रास : अशोक पवार

Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…

शिरुर-हवेलीत अशोक पवारांची प्रचारात आघाडी अन महायुतीत मात्र बिघाडी…?

शिरूरमधील काँग्रेस अशोक पवार यांच्याच पाठीशी; कार्यकर्त्यांचा निर्धार…

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

18 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago