मुख्य बातम्या

शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवल्याने कुटुंबाला, ‘घोडगंगा’ला त्रास : अशोक पवार

शिरूर (तेजस फडके): महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अडीच वर्षांपासून सगळे चुकीचे राजकारण चालले आहे. ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही घटना घडल्या, उलथापालथ झाली, त्या काळात मी निष्ठेने शरद पवार यांना साथ दिली. याचा बदला म्हणून मला, माझ्या कुटुंबाला व माझ्या घोडगंगा कारखान्याला खूप त्रास दिला; परंतु काही झाले, प्रसंगी जीव द्यायची वेळ आली, तरी मी शरद पवार साहेबांना सोडणार नाही म्हणजे नाही, असा निर्धार शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांनी येथे व्यक्त केला.

शिरूर हवेली विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज समाधिस्थळावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली. यावेळी समाधिस्थळावरील श्री संगमेश्वर मंदिरात आरती केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अशोक पवार यांनी निवडणूक प्रचारार्थ पेरणे येथे भेट दिली असता, पेरणे फाटा, तापकीर वस्ती परिसरामध्ये आमदार अशोक पवार यांची बैलगाडीमधून मिरवणूक काढून जोरदार स्वागत केले.

विकासकामात राज्यात अशोक पवार यांचा हात कोणी धरू शकत नाही. लोकांची सेवा करणारा आमदार आहे, राज्यातील शिवसैनिक वाट पाहते होते, ते नक्कीच विरोधकांना त्याची जागा दाखवतील. सर्व शिवसैनिक अशोक पवारांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दौलत पायगुडे यांनी सांगितले.

Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…

शिरुर-हवेलीत अशोक पवारांची प्रचारात आघाडी अन महायुतीत मात्र बिघाडी…?

शिरूरमधील काँग्रेस अशोक पवार यांच्याच पाठीशी; कार्यकर्त्यांचा निर्धार…

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

7 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago