ranjangaon-midc-police station
कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एक युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत बसलेले असताना दोन व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवत लाथा बुक्क्यानी मारहाण केली. तसेच आळीपाळीने त्या युवतीवर बलात्कार करुन तिच्या अंगावरील सोनं काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन हद्दीत घडला आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ दखल घेत १२ तासाच्या आत त्या दोन नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अमोल नारायण पोटे (वय २५) रा. संस्कृती डेव्हलपर्स पवार बिल्डींग, कारेगाव ता. शिरुर जि. पुणे मुळ (रा. ढोकराई फाटा, ता. श्रीगोदा जि.अहील्यानगर) आणि किशोर रामभाऊ काळे (वय २९) रा. संस्कृतीडेव्हलपर्स, लेन नं.१, कारेगाव ता. शिरुर जि.पुणे मुळ (रा. किल्ले धारुर, ता.धारुर जि.बीड) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एक १९ वर्षीय युवती आणि तिचा २० वर्षीय मामेभाऊ रात्री च्या सुमारास कारेगाव येथून घरी जात असताना घराच्या काही अंतरावर गप्पा मारत बसले होते. रात्री ११:०० च्या सुमारास एका दुचाकीवर दोन जण आले. त्यांनी पीडित युवती आणि तिच्या मामे भावाला त्यांच्याकडील चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने एकमेकांना चुंबन व शरीर संबध करण्यास भाग पाडले आणि त्यांच्याकडील मोबाईल मध्ये फोटो व व्हिडीओ शुटींग काढून घेतले.
त्यानंतर पिडीतेच्या मामे भावाला त्यातील एकाने थोड्या अंतरावर घेवून गेला आणि त्यापैकी एकाने पीडितेवर बलात्कार केला. त्याच्यानंतर दुसऱ्याला बोलावून घेवुन पहिला युवक पिडीतेच्या मामे भावाकडे गेला. त्यानंतर दुसऱ्याने पीडिता आणि तिच्या मामे भावाला मारुन टाकीन नाहीतर आणखी लोकांना बोलावुन घेईन अशी धमकी देत पिडीतेवर बलात्कार केला आणि पिडीतेच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरी करुन निघुन गेले.
पीडित युवतीने घरी जावून घडलेला सर्व प्रकार तिच्या बहीणीला सांगितला. त्यानंतर बहिणीच्या पतीने डायल ११२ वर कॉल करुन सदर प्रकाराची माहीती रांजणगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत पिडीतेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आणि आरोपी अमोल नारायण पोटे आणि किशोर रामभाऊ काळे या दोघांना ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सविता काळे या प्राथमिक तपास करत आहेत. रांजणगाव पोलिसांनी आरोपीना आज (दि २) रोजी शिरुर न्यायालयात हजर केले असता आरोपीना ७ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती आरोपीचे अॅड वकील किरण रासकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर…
पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात (ता. २५ ) रोजी एका २६ वर्षीय युवतीवर बलात्कार झाला होता. तो आरोपी शिरुर तालुक्यातीलच होता. त्यानंतर काही दिवसातच शिरुर तालुक्यात दारु पिऊन आलेल्या दोन व्यक्तींनी एका १९ वर्षीय युवतीवर आळीपाळीने बलात्कार करत तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढुन घेतल्याने पुणे जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरण! आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीने केला मोठा दावा…
पोलिस संजू जाधव यांचा आवाज आरोपी दत्ता गाडे याने ओळखताच मोबाईलवर फोन केला अन्….
शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…
शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…
धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…