मुख्य बातम्या

स्वारगेट बलात्कार प्रकरण! आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीने केला मोठा दावा…

पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी (ता. २५) पहाटे दत्तात्रय गाडे याने युवतीवर (वय २६) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी पहाटे आरोपीला गुणाट (ता. शिरूर) या गावातून अटक करण्यात आली आहे. आरोपीला पकडल्यानंतर न्यायलयात हजर करण्यात आले. त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद करत असताना हा बलात्कार नसून दोघांच्या समंतीने संबंध निर्माण झाले असा दावा केला आहे, यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागलं आहे. अशातच दत्ता गाडे याच्या पत्नीनेही देखील पतीची पाठराखण करत मोठं वक्तव्य केले आहे.

स्वारगेट अत्याचार प्रकरणाबाबत बोलताना दत्तात्रय गाडेची पत्नी म्हणाली, ‘मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे. ती मुलगी म्हणतेय की, माझ्या नवऱ्याने बलात्कार केला आहे. बलात्कार केला तर मग तिचे कपडे कुठे फाटले आहेत का? तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसत आहे का? बसमध्ये चढताना आधी युवती पुढे गेली मग माझा नवरा गेला. याला बलात्कार म्हणतात का? असा सवाल दत्ता गाडेच्या पत्नीने उपस्थित केला आहे. पीडितेच्या सहमतीने शारीरिक संबंध झाला आहे. तिच्यावर बलात्कार होत होता तर त्या युवतीने आरडाओरड का केली नाही?’

दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुरु आहे. आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी होणार असल्याची माहिती आहे. आरोपीच्या डीएनए चाचणीसाठी रक्त आणि केस फोरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. आरोपीविरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत. बसची फॉरेन्सिक चाचणीत पोलिसांना पुरावे मिळाले आहेत. ससून रुग्णालयात आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली ती पण पॉझिटिव्ह आली आहे.

सविस्तर घटनाक्रम असा…
1. मंगळवारी (ता. 25) पहाटे सहाच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये घडली अत्याचाराची घटना घडली.
2. मंगळवारी सकाळी 09.30 च्या सुमारास पीडिता स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाली, तोवर आरोपी बसने आपल्या गावी गेला.
3. सकाळी 10 च्या सुमारास स्वारगेट पोलिसांनी बस स्थानकावरील सीसीटीव्ही फूटेज तपासून दत्तात्रय गाडे हा आरोपी असल्याचे निष्पन्न केले. (पीडितेने देखील हाच आरोपी असल्याचे पोलिसांना सांगितले, तपास सुरू झाला होता.)
4. सकाळी 10 वाजता आरोपी दत्तात्रय गाडे त्याच्या गुनाट गावातील काल्याच्या कीर्तनात सहभागी झाला होता.
5. पोलिसांनी गुन्ह्याच्या वेळी आरोपीचे लोकेशन तपासले असता ते स्वारगेट बस स्थानकात आढळून आले.
6. सकाळी 11 वाजता स्वारगेट पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक गुनाट गावाकडे रवाना झाले.
7. दुपारी अडीचच्या सुमारास पोलिस गुनाट गावात दाखल झाले.
8. दुपारी 4 वाजता आरोपी पकडल्याची माहिती मिळाली. मात्र, तो दत्तात्रयचा भाऊ असल्याचे निष्पन्न झाले. दत्ता गाडे आणि त्याचा भाऊ दिसायला एकसारखे दिसतात.
9. आरोपी दत्तात्रय घराकडे येत असताना त्याने पोलिसांना बघितल्यावर उसाच्या शेतातपळ काढला.
10. गावकऱ्यांनी दत्तात्रयला गावाच्या परिसरातच बघितल्याचे सांगितल्याने शोधाशोध सुरू झाला होता.
11. बुधवारी (ता. 26) दुपारी 12च्या सुमारास अत्याचाराची घटना उघडकीस आली. गुन्हे शाखा, स्वारगेट पोलिस, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह 18 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू झाला.
12 . पोलिसांकडून सरपंच, पोलिस पाटील, तरुण मुलांच्या बैठकांना सुरुवात झाली. यावेळी आजूबाजूच्या अन्य गावच्या लोकांना बोलावत फोटो देऊन आरोपी दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
13. आरोपी दत्तात्रय शेतात दिसल्याची गावकऱ्यांची पुष्टी केली.
14. रात्री आठच्या सुमारास आरोपी गावातील नातेवाइकाकडे पाणी पिण्यासाठी आला होता.
15. गुरुवार (ता. 27) पुणे पोलिसांनी धाराशिव येथून 2 थर्मल ड्रोन मागवले. यासह श्वान पथकासह सकाळी साडेदहापासून शोधाशोध सुरू झाला.
16 . श्वान पथकाने दत्तात्रयचा ज्या ठिकाणी वावर होता अशा 3 ठिकाणी पोलिसांना नेले सर्वात्र शोध घेतला.
17. ऊस पूर्ण वाढलेला असल्याने, तसेच 150 एकरमध्ये उसाची शेती असल्याने पाणी, दलदल यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते.
18 . रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी चांदणशिव वस्तीतील बहिरट यांच्या घरी पाणी पिण्यासाठी आला. त्यांनी दार न उघडताच खिडकीतून पाणी दिले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात पोलिस कर्मचारी असलेल्या त्यांच्या भावाला दत्तात्रयबाबत माहिती दिली.
19. संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने पुणे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर गावातील 300 मुले, गुन्हे शाखेचे 70 कर्मचारी आणि स्वारगेट पोलिसांचे 20 कर्मचारी दुचाकीवरून आरोपीच्या शोधात होते.
20. मध्यरात्री1 वाजून 10 मिनिटांनी गावापासून 150 ते 200 मीटर असलेल्या माळरानात (क्रिकेटचे मैदान) चरीतून पळताना आरोपी दत्तात्रयला पकडले.
21. मध्यरात्री दीडच्या सुमारास स्वारगेट पोलिस ठाण्याचे एपीआय मोकाशी व पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेत पुण्याच्या दिशेने रवाना झाले. पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोपीला घेऊन स्वारगेट पोलिस लष्कर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

दत्ता गाडे अन् भाऊ दिसतात सेम-टू-सेम!; अहो साहेब मी तो नव्हेच…

पुणे बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचे बेताल, असंस्कृत व विकृत विधान, गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी करा

पोलिस संजू जाधव यांचा आवाज आरोपी दत्ता गाडे याने ओळखताच मोबाईलवर फोन केला अन्….

आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक होण्यापूर्वी करायची होती आत्महत्या पण…

आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी सांगितलं…

…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड

आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…

शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…

स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करा…

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली…

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…

शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार

शिरुर तालुक्यात अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई प्रेस क्लबमधून तीन सदस्यांची हकालपट्टी; भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंधित बैठक ठरली कारणीभूत

मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…

4 तास ago

राज्यात पर्यटन विकासाला गती; पायाभूत सुविधा व सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर; मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…

4 तास ago

कोल्हापूरात तरुणींवर अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; मुख्य आरोपी अटकेत, साथीदार फरार

सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…

4 तास ago

महाराष्ट्रात कामगार कायद्यांचे नवे मसुदे जाहीर; ४५ दिवसांत हरकती-सूचना मागविल्या

मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…

4 तास ago

CSMT परिसरात हरवलेल्या ८ वर्षीय बालिकेचा तासाभरात शोध; महिला फौजदार चेतना पाटील यांचा मंत्रालयात सन्मान

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…

4 तास ago

पत्रा चाळ रहिवाशांना दिलासा; भाड्यात १०% वाढीचा निर्णय

मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…

4 तास ago