मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात सेवानिवृत्त आधिकाऱ्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील रहिवाशी व पुणे जिल्हा परीषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे व राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कडी-कोयंडे उचकटून चोरटयांनी चोरी केली आहे.

प्रभाकर गावडे यांच्या घरातून लोखंडी कपाट उचकटून ५ तोळे वजनाचे किं.रु. २५०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १५,०००रू असा एकूण २,६५,००० रू चे घरफोडी करून चोरट्यांनी दागिन्यांसहीत रोख रक्कम चोरून नेली आहे.

याबाबत सविस्तर हकिकत अशी की, १९ रोजी रात्री ०९.३० वाजण्याचे सुमारास प्रभाकर गावडे व त्यांच्या मुलगा वेदातं असे जेवण करून टाकळी हाजी गावातील घर बंद करून झोपणेसाठी शेतातील दुसऱ्या घरी गेले होते. त्यांनंतर आज (मंगळवार) सकाळी ०६.३०वा. चे सुमारास शेजारी राहणाऱ्या सुप्रीया अमोल गावडे हिने फोनवरून प्रभाकर गावडे यांना तुमचे घर उघडे दिसत आहे कोणीतरी दरवाजाचा कोंडा तोडलेला दिसत आहे, अशी माहीती मिळाल्याने ते घरी गेल्यावर घराचे कोंडा तुटुन कोंडयांसहीत कुलुप पडलेले दिसले. तेव्हा नागरिक जमा झाल्यानंतर घराची पाहणी केली असता घरातील बेडरूममध्ये असलेले लोखंडी कपाट उघडे दिसले. तेव्हा कपाटाची पाहणी करता लोंखडी कपाटाचे लॉकर उचकटुन उघडलेले दिसले व त्यातील सोन्याचे दागीने दिसून आले नाही. त्यांनतर घराची पाहणी करीत असताना प्रभाकर गावडे यांचे चुलत भाऊ महादेव श्रीपती गावडे यांचे पण घराचे कुलूप तोडलेले दिसले. व त्यांना फोन करून घरात चोरी झालेबाबत माहीती दिली असता त्यांच्या घरात जावून पाहणी केली असता त्यांचे घरात उचकपाचक करून कपडे खाली पडलेले दिसले.

महादेव श्रीपती गावडे यांचे घरातील दोन टेबल फॅन प्रभाकर गावडे यांच्या घरात चोरटयाने ठेवलेले दिसले. तेव्हा प्रभाकर गावडे व महादेव गावडे असे दोघांचे घरात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने घूसून घरातील एकूण ०५ तोळे वजनाचे किं.रु. २५०००० रु.चे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १५,०००रू असे एकुण २,६५,००० रू चे घरफोडी करून चोरून नेले आहेत. प्रभाकर गावडे यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरूदध फिर्याद दिली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस नाईक धनंजय थेऊरकर, पोलिस शिपाई विशाल पालवे, पोलिस हवा. अनिल आगलावे यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.

कायदा सुवस्थेचा प्रश्न…
टाकळी हाजीमध्ये माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या घराच्या हाकेच्या अंतरावर बंद घर हेरून सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी आधिकारी प्रभाकर गावडे व सेवानिवृत्त पोलिस उपविभागीय आधिकारी महादेव गावडे यांच्या घरावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. बेट भागात अनेक दिवसापासून चोऱ्यांचे सत्र सुरु असून, आता अधिकाऱ्यांच्या बंद घरावर चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. पोलिस आधिकाऱ्यांचीच घरे सुरक्षित राहिली नसून, कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

6 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

1 आठवडा ago