मुख्य बातम्या

पुणे ते शिरूर सहापदरी महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला होणार सुरूवात…

पुणे : पुणे-संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे प्रकल्पाला अखेर अर्थसंकल्पीय निधीची जोड मिळाली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १४,८८६ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आल्याने प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे.

महामार्ग हा २४५.९ किमी लांबीचा सहापदरी ग्रीनफील्ड प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे ते शिरूर (५३.४ किमी) या मार्गाची निविदा प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असून, पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील शिरूर ते संभाजीनगर (१९२.५ किमी) या मार्गासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे संपूर्ण प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या छत्रपती संभाजीनगर ते पुणे प्रवास करण्यासाठी साधारणपणे ६ तासांचा वेळ लागतो. मात्र, हा एक्स्प्रेस वे पूर्ण झाल्यानंतर हेच अंतर प्रवाशांना अवघ्या ३ तासांत पार करणे शक्य होणार आहे. यामुळे व्यापारी, विद्यार्थी आणि चाकरमान्यांचा मोठा वेळ वाचणार आहे.

एमएसआयडीसीच्या नियोजनानुसार, या प्रकल्पासाठी १ वर्ष भूसंपादन आणि प्रशासकीय प्रक्रियेसाठी लागणार आहे, तर त्यानंतर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ४ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. थोडक्यात, पुढील ५ वर्षांत हा आधुनिक महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. या प्रकल्पामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्थेला मोठी उभारी मिळणार असून, उद्योगांनाही चालना मिळणार आहे.

पुणे ते छ. संभाजीनगर महामार्गाच्या प्रकल्पाच्या कामाला अखेर वेग; खराडी ते शिरूर…

पुणे-शिरूर महामार्ग खरंच होणार कोंडीमुक्त; तीन मजली उड्डाणपुलाचे काम मार्चपासून…

पुणे आणि शिरूरचा सहा पदरी उड्डाण मार्गाला जोडला जणार समृद्धी महामार्ग; कोठून पाहा…

छत्रपती संभाजीनगर ते पुणे नव्या महामार्गाचा मॅप व्हायरल…

Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

12 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

12 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

12 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

12 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

18 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

19 तास ago