मुख्य बातम्या

दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…

पुणे : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शिरुर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आजारपणामुळे सहभागी होता आले नाही, त्या दुःखी भावना सांगताना दिलीप वळसे पाटील भावुक झाले होते. आपण प्रचारात हजर राहू शकलो नाही, असे सांगताना भर सभेत दिलीप वळसे पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर सभेतील कार्यकर्त्यांमध्ये काही काळ शांतता निर्माण झाली होती.

शिरुर लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला. शिरूरची लढत आणि पराभवानंतर शिवाजीराव आढळराव पाटील सोबत राहिल्याची आठवणी सांगताना मंचर येथील सहविचार सभेत दिलीप वळसे पाटील यांना अश्रू अनावर झाले. या भावनिक प्रसंगानंतर सभेतील कार्यकर्तांमध्ये काही काळ शांतता निर्माण झाली.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘दुर्दैवाने मी आजारी असल्याने प्रचारात येऊ शकला नाही. थोडी अडचण झाली, पण नियतीपुढे काही इलाज नसतो. रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन मंचरला आलो आणि निवडणूक होईपर्यंत इथेच थांबायचं ठरले. परंतु पुढे आणखी त्रास झाल्याने मला मुंबईतील रुग्णालयात जावे लागले.’

दरम्यान, शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांची साथ दिली. त्यानंतर शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात सभा घेत त्यांच्यावर टीका केली होती. त्याचसोबत देवदत्त निकम यांना बळ देण्याची भूमिका घेतली. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांचे उमेदवार अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळाल्याने त्याचा परिणाम आता विधानसभेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, हात फ्रॅक्चर तर…

पुर्वा वळसे पाटील यांचा बनावट अकाउंटबाबत सोशल मीडियावरून खुलासा…

खासदार डॉ अमोल कोल्हे यांना पुर्वा वळसे पाटील यांच्याकडुन विजयाच्या शुभेच्छा अन चर्चांना उधाण…

मोठी बातमी! शरद पवार यांचा दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का…

मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात धडाडणार शरद पवार यांची तोफ…

ग्रामपंचायत निवडणूक! दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का…

दिलीप वळसे पाटील यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका अन् स्पष्टीकरण…

दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू…

वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

3 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

3 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

3 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

3 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

4 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

9 तास ago