क्राईम

तळेगाव-न्हावरे रोडवर ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन पिकअप चालकाने ठोकली धूम…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील तळेगाव-न्हावरा रोडवर म्हाळुंगी फाट्यावरती ७ जून रोजी सायंकाळी ८ च्या दरम्यान सुखदेव सोपान मस्के (रा.टाकळी भीमा, ता.शिरूर) हे त्यांच्या मोटारसायकल वरून घोलपवाडी बाजूने घरी जात असताना विरुद्ध बाजूने येणाऱ्या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिल्याने मस्के यांचा उपचारापर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सविस्तर माहिती अशी की, ज्येष्ठ नागरिक सुखदेव मस्के हे तळेगाव-न्हावरा रोड वर घोलपवाडीला असणाऱ्या डेरी वरती दूध घालून घरी परतत होते. श्रावणी हॉटेलच्या समोर न्हावरे बाजूने भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात पिकअपने मस्के यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या घटनेत मस्के यांच्या डोक्याला गंभीर मार लागला व मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. पिकअप चालकाने मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पिकअप सह धूम ठोकली. नागरिकांनी तातडीने मस्के यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले. परंतु, उपचारापूर्वीच म्हस्के यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अखेर त्या खड्ड्याने जीव घेतलाच….
तळेगाव-न्हावरे रोडवर शिवतक्रार म्हाळुंगी येथे फॉरेस्ट हद्दीत दोन लेन असणारा रोड एक लेन केला आहे. या सिंगल रोडवर साईड पट्टी वर डांबरी फुटून ठिकठिकाणी धोकादायक खड्डे झाले आहेत. या ठिकाणी वाहने वेगात आल्यावर हा खड्डा हुकवण्याच्या प्रयत्न करतात. त्यामुळे अरुंद असणाऱ्या या रोडवर अपघात होतात. मागेच दोन-तीन दिवसांपूर्वी एक मोटारसायकल चा अपघात होऊन एका व्यक्तीचे दात पडले होते, तसेच चारचाकी कार या खड्ड्यात आदळून टायर फुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

नऊ दिवसांच्या आत ही दुसरी घटना…
शिरुर तालुक्यात एका अल्पवयीन पोलिस पाटलाच्या मुलीने दि 31 मे रोजी सकाळी 10च्या सुमारास मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील तीसवर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला नऊ दिवस पूर्ण झाले नाही तोच हिट अँड रनची ही दुसरी घटना घडल्याने नागरिकांमधून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नागरिक संतापले…
वेळोवेळी ग्रामस्थांनी (NH 548D) च्या संबंधित अधिकाऱ्यांकडे स्पीड ब्रेकरची व ओढ्यांवरती पुलाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक ग्रिल बसवण्याची, साईट पट्टे व डांबरीला ठीक ठिकाणी किनारी फुटल्यामुळे पडलेले खड्डे भरण्याची मागणी केली आहे. या रस्त्याला वाहतूक वाढल्यामुळे स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहने अतिशय वेगात चालतात.यासंदर्भात नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी केली असता अधिकाऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांकडून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सदर घटनेबाबत देविदास बाळासो करपे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पवार हे करत आहेत.

कवठे येमाई येथे अपघातात एक ठार, दुसरा गंभीर जखमी…

दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; दोघांसह चिमुकला ठार…

शिरूर तालुक्यात महिलेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून मृत्यू…

Video; शिरुर येथे मोठा अनर्थ टळला रस्ता दुभाजक ओलांडून मालवाहु कंटेनरची थेट सलुन दुकानाला धडक

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

12 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

19 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

19 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

19 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

20 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

21 तास ago