sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका अन् स्पष्टीकरण…

मुख्य बातम्या राजकीय

पुणे: अजित पवार गटाचे नेते आणि शरद पवारांचे अनेक वर्षं सहकारी राहिलेले दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जनतेने एकदाही बहुमत देऊन शरद पवार यांना मुख्यमंत्री केले नाही असे वळसे पाटील रविवारी एका कार्यक्रमात म्हणाले. या विधानामुळे राजकीय क्षेत्रात बरीच खळबळ माजली आहे.

दिलीप वळसे पाटील आता जरी अजित पवार यांच्यासोबत असले तरी ते शरद पवार यांचे अतिशय विश्वासू मानले जायचे. शरद पवार यांचे एकेकाळचे स्वीय्य सहाय्यक ते राज्याचे गृहमंत्री हा त्यांचा प्रवास अनेकदा चर्चेचा विषय देखील असतो. असे असताना देखील शरद पवार यांच्यावर इतकी बोचरी टीका वळसेंनी का केली असावी, याची चर्चा आता रांगू लागली आहे.

दरम्यान, राज्यातील राजकारणात गेल्या महिन्यात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा दिला. तेव्हापासून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीकास्र डागत आहेत. पण, आता पहिल्यांदाच मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले आहे.

दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ‘शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. आपल्याकडे शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असताना फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात. देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही. पण, महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत. आपल्याकडं शरद पवारांसारखे उत्तुंग नेते आहेत. मात्र, आपले फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते.’

दरम्यान, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असे आता मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. शरद पवारांविषयी दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी एक वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

माझ्या वाक्याचा अर्थ मीडियाने चुकीचा लावलेला दिसतो आहे. माझं संपूर्ण भाषण जर ऐकले तर लक्षात येईल की मी शरद पवार यांच्याविषयी असे उद्गार काढलेले नाहीत. माझे म्हणणे असे होते की, गेली ४० ते ५० वर्षे शरद पवारांनी या राज्यासाठी, देशासाठी काम केले आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातले अनेक पक्ष स्वतःच्या हिंमतीवर बहुमत मिळवून सत्तेवर बसले आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने अशी शक्ती शरद पवार यांच्या मागे उभी केली नाही याची मला खंत आहे. मी खंत व्यक्त करत होतो, त्यात शरद पवारांना कमी लेखण्याचा किंवा काही चुकीचं बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शरद पवार हे आमचे नेते आहेत, तेच भविष्यातही आमचे नेते राहतील, असेही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…

दिलीप वळसे पाटील यांच्या मक्तेदारीला मतदार संघातूनच आव्हान…

दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू…

शरद पवारांचा एल्गार; पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात…

दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाहीः आढळराव पाटील