purva-walse-patil

पुर्वा वळसे पाटील यांचा बनावट अकाउंटबाबत सोशल मीडियावरून खुलासा…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके )सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांचे सोशल मीडियावरील X अकाऊंटवर @PurvaWalsePatil या नावाने अधिकृत खाते आहे. परंतु, @PurvaWPatil_FC या नावाने एक खाते असून, त्या खात्यावरून काही मेसेज व्हायरल झाले आहेत. शिवाय, संबंधित अकाऊंटच्या अधारे करण्यात आलेल्या बातम्या या निराधार आहेत, अशी माहिती पुर्वा वळसे पाटील यांच्या कार्यालयातून www.shirurtaluka.com ला देण्यात आली आहे.

अधिकृत अकाऊंट

पूर्वा वळसे पाटील यांचे सोशल मीडियावरील X अकाऊंटवर @PurvaWalsePatil या नावाने अधिकृत खाते आहे. पुर्वा वळसे पाटील यांनी अधिकृत X अकाऊंटवरू माहिती दिली आहे. ती पुढीलप्रमाणे…
The following are my official social media account handles. Kindly note that messages posted from any other account in my name are not posted by me or my team. Thank you. 🙏🏼

– https://x.com/purvawalsepatil
– https://m.facebook.com/purva.walsepatil/
– https://m.facebook.com/WalsePatilPurva/
– https://instagram.com/purvawalsepatil/?hl=en

दरम्यान, खासदार डॉ अमोल कोल्हे यांना पुर्वा वळसे पाटील यांच्याकडुन विजयाच्या शुभेच्छा अन चर्चांना उधाण…अजित पवार यांना धक्का! दिलीप वळसे पाटील परतीच्या मार्गावर… या बातम्या निराधार आहेत. पुर्वा वळसे पाटील यांच्या X वरील अधिकृत अकाऊंटवरून अशा प्रकारचे कोणतेही ट्विट करण्यात आलेले नाही.

फेक अकाऊंंट…