sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू…

राजकीय

मुंबईः अजित पवार यांनी रविवारी (ता. २) सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याहीपेक्षा जास्त मोठा धक्का प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा कसा काय दिला हाच प्रश्न सर्वांना सतावत आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी यावर भाष्य करताना दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे शरद पवार यांच्या डोळ्यात अश्रू आले होते असा खुलासा केला आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल विचारण्यात आले असता आव्हाड म्हणाले, ‘ज्या मुलाला हातावर बाळासारखं हातावर खेळवलं त्याने असे करावे. नियतीने यापेक्षा मोठा त्रास शरद पवार यांना काय द्यावा. तो सर्वात लाडका विद्यार्थी होता. दिलीप म्हटलं की सगळं बाजूला. शरद पवार यांना ह्रदय नाही असं वाटतं का? शरद पवार यांनी मला दिलीपही मला जायचं आहे असं सांगून गेला, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांच्या डोळ्यात एक अश्रू दिसत होता. इतका माणूस निष्ठूर नसतो.’

‘आपल्या घरात 12 वर्षं सोबत राहिलेला कुत्रा मेल्यावरही आपण जेवत नाही. कुत्रा काही बोलत नसतो, मागत नसतो. पण सहवास नावाची काही गोष्ट आहे की नाही? प्रेम, सहवास यंच्या काही व्याख्या आहेत की नाही. सत्ता हीच व्याख्या असेल तर माणुसकीचा अंतच झाला. सत्तेसाठी सर्व काही ही व्याख्या जगाला माणुसकी बुडवणारी आहे,’ असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शरद पवार की अजित पवार चूक नेमकी कोणाची? असे विचारण्यात आले असता जितेंद्र आव्हाड यांनी प्रेमाची चूक असल्याचे सांगितले. शरद पवार यांच्याकडून ही प्रेमाची चूक झाली. बोट ठेवेल ते मिळालं अशी एकच व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात होती ती म्हणजे अजित पवार. शरद पवार यांच्यामुळे अजित पवार यांना सहजासहजी मिळत गेले.’