शिरूर (तेजस फडके) : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची वडगाव रासाई येथे आज (गुरुवार) जाहीर सभा झाली. शरद पवार यांचे जोरदार भाषण झाले. यावेळी त्यांनी अजितदादांची मिमिक्री केली, याला नागरिकांनी टाळ्या व शिट्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.
Live Video : आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार : शरद पवार
शरद पवार म्हणाले, ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारानिमित्त मी राज्यभर फिरतोय. प्रचंड संख्येने महिला, तरुण, वडीलधारे सभेला येत आहेत. तासनतास बसतात, विचार ऐकतात आणि सांगतात तुम्ही चिंता करू नका, महाराष्ट्र चांगल्या लोकांच्या हातात द्यायचा ही तुमची अपेक्षा आहे, त्याची पूर्तता आम्ही करू. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन अटळ आहे.
शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात ऐन निवडणुकीत कळीचा मुद्दा बनलेल्या आणि बंद असलेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत शरद पवार यांनी आज भर सभेत अजित पवार यांची नक्क्ल करीत पोलखोल केली. काही लोकांनी पैसे असताना, पैसे मंजूर केल्यावरही थांबवले, कारखाना सुरू करू दिला नाही. मी स्वतः बँकेशी बोललो, मुख्यमंत्र्यांना भेटलो. मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, माझी फार अडचण आहे. तुम्ही समजून घ्या. मग माझ्या लक्षात आले की हा दम देणारा कोण होता? असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांची नक्कल केली.
काही माणसे बाहेरून येतात आणि सांगतात कारखाना कसा सुरू होतो तेच बघतो, निवडून कसा येतो तेच बघतो, शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काढलेला घोडगंगा साखर कारखाना अजित पवार यांनीच बंद पाडल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. तसेच महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर आपण लक्ष घालून हा कारखाना सुरू करू, असे आश्वासन देखील दिले.
Live Video: दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी नाही, त्यांना पराभूत करा: शरद पवार
अशोक पवार यांना मिळत असलेल्या प्रतिसादाची विरोधकांनी घेतली धास्ती…
शिरुर-हवेलीत अशोक पवार यांच्या विरोधात ‘मलिदा गँग’ मैदानात…
निष्ठावंत विरूद्ध गद्दार अशीच सध्याची निवडणूक : अशोक पवार
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण; पाहा संबंधित Video…
काही लोकं म्हणाले बापू त्या पोरांना माफ करा, अरे काय चाललंय, हा प्रकार काय? : अशोक पवार
आमदार अशोक पवार यांच्या मुलाच्या प्रकरणात वाघोली कनेक्शन?
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण अन् खंडणी…
शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवल्याने कुटुंबाला, ‘घोडगंगा’ला त्रास : अशोक पवार
Video: अशोक पवार झाले भावुक; उपस्थितही गहिवरले…
शिरुर-हवेलीत अशोक पवारांची प्रचारात आघाडी अन महायुतीत मात्र बिघाडी…?
शिरूरमधील काँग्रेस अशोक पवार यांच्याच पाठीशी; कार्यकर्त्यांचा निर्धार…
घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…
मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर