मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती ZP गट! खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात: मानसिंग पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघात पाण्याच्या प्रश्नावरून आरोप-प्रत्‍‌यारोपांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी विरोधकांवर ‘खोटारडेपणाचा आश्रय घेत प्रचार करण्याचा’ गंभीर आरोप केला आहे.

मानसिंग पाचुंदकर यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले की, ‘विरोधकांनी गावभेटीमध्ये एका महिलेला धमकावल्याचा खोटा आरोप केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. ‘मत नाही दिलं तर पाणी देणार नाही’ असा दावा करण्यात आला. पण, हा आरोप पूर्णपणे निराधार असून ‘खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात; परंतु विरोधकांनी त्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत,’ अशी टीका त्यांनी केली.

मानसिंग पाचुंदकर यांनी आव्हान दिले की, जर हा प्रकार खरा असेल तर संबंधित महिला आणि आरोप करणारे नेते दोघांनीही महागणपती मंदिरात जाऊन शपथ घ्यावी. ‘कोणते गाव, कोणती महिला आणि आमच्यापैकी कोण धमकावले हे तरी स्पष्ट बोलावे,’ पाण्याच्या वाटपाबाबतच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, ‘मतदानानुसार पाणी देणे-थांबवणे हा हास्यास्पद आरोप आहे. चासकमान प्रकल्पाचे पाणी आम्ही घरात टँकरने नेणारे नाही.’ लोकांच्या पाण्याच्या प्रश्नावर आपली भूमिका नेहमीच ठाम असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, ‘लोकांना पाणी मिळावे म्हणून ३–४ वाजेपर्यंत कोंढापुरीच्या तळ्यावर थांबून पाणी सोडण्याची लढाई आम्ही लढलोय. विरोधकांनी आंदोलन केल्याच्या दाव्यावरही त्यांनी टीका करताना म्हटले की, ‘जनता मूर्ख नाही; पाण्यासाठी कोण झटलं आणि कोण केवळ दावा करतो हे गावागावातील लोकांना ठाऊक आहे. जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी असल्यामुळे विरोधकांच्या पाया खालील वाळू सरकायला लागली आहे.’

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव गटातील राजकीय वातावरणात तापले असून आगामी कालावधीत ही वादळी चर्चा आणखी रंग घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मानसिंग पाचुंदकर यांची फेसबुक पोस्ट पुढीलप्रमाणे जशीच्या तशी…
● खोटं बोल पण रेटून बोल — हा जणू जन्मसिद्ध हक्कच बनवलेल्यांनी काल पुन्हा एकदा खोटारडेपणाचा केविलवाणा प्रयत्न केला!

पद्मावती वस्तीवरील छोट्या कार्यक्रमात तर एक नवीनच खोटारडेपणाचा पर्व सुरू झाला.
म्हणे ते गावभेटीवर गेले तेव्हा कुठल्या तरी “मैत्रिणीने” त्यांना सांगितलं की—
“समोरचे म्हणजे आम्ही त्या महिलेला धमकावलं… मत नाही दिल तर पाणी देणार नाही!”

अहो, खोटं बोलण्यालाही काही मर्यादा असतात; पण इथे तर खोट्याचा कळसच गाठलाय!

जर खरंच ते महागणपतीच्या पावन भूमीत राहणारे असतील, तर एकदा महागणपती मंदिरात येऊन—
तुम्ही आणि त्या संबंधित महिलेने गणपती मंदिरातील दुर्वा हातात घेऊन शपथ द्यावी—
▪️ कोणत्या गावात?
▪️ कोणत्या महिलेला?
▪️ आमच्यापैकी नेमकं कोण धमकावलं?
किमान हे तरी स्पष्ट बोलावं!

पण नाही… कारण त्यांचे मार्गदर्शकच अपप्रचारात PHD करून बसलेत.
खोटं रेटून सांगायचं आणि तेच सत्य असल्यासारखं बाजार मांडायचा त्यांचा उद्योग किती दिवस चालणार?

आता तर म्हणे आम्ही मतदान न करणाऱ्यांचं पाणी अडवू!
अहो, चासकामाचं पाणी आम्ही काय टँकरने घरी नेणार आहोत का?
मत दिलेल्यांना पाणी देणार आणि मत न देणाऱ्यांना पाणी बंद करणार—
अशी हास्यास्पद वाटणी करण्याचा उद्योग आम्ही करणार?

भान ठेवा… उचली जीभ आणि लावली टाळ्याला म्हणून काहीही बोललं की जनता विश्वास ठेवते असं नाही.

कारण लोकांच्या पाण्याच्या प्रश्नावर आमची भूमिका कालही स्पष्ट होती, आजही तितकीच ठाम आहे आणि उद्याही तितकीच राहणार!
लोकांच्या पाण्यासाठी आम्ही ३–४ वाजेपर्यंत कोंढापुरीच्या तळ्यावर थांबून पाणी सोडण्याची लढाई लढलोय.
आणि हे साहेब म्हणतात त्यांनी आंदोलन केलं…

जनता मूर्ख नाही.
पाण्यासाठी कोण झटलंय, कोण उभं राहतं—हे प्रत्येक गावातील लोकांना ठाऊक आहे.

त्यामुळे ते कितीही खोटं बोलोत—
जनता त्यांच्या या खोट्या रडारडीला बळी पडणारी नाही.

एकच सत्य—
जनता आज ठामपणे आमच्या पाठीशी उभी आहे, आणि त्यांच्याखालची वाळू सरकायला सुरुवात झालीय!

– मानसिंगभैय्या नानासाहेब पाचुंदकर पाटील
अध्यक्ष, शिरूर–आंबेगाव विधानसभा मतदारसंघ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

शिरूर मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी…

शिरुरच्या ७ जिल्हा परिषद गट तसेच १४ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

21 मिनिटे ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

30 मिनिटे ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

5 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

5 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

5 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

5 तास ago