मुख्य बातम्या

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक; पाहा मतदान आणि मतमोजणी कधी…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून, शिरूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था, शिरूर) हरिश्चंद्र कांबळे यांनी बाजार समितीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम (नमुना क्र. ६) जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी ५ जुलै २०२६ रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये सेवा सहकारी संस्था मतदार संघातून ११ जागा, ग्रामपंचायत मतदार संघातून ४ जागा, व्यापारी-आडते मतदार संघातून २ जागा आणि हमाल-मापाडी मतदार संघातून १ जागेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रमुख राजकीय गट, सहकारी संस्था आणि स्थानिक नेत्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २९ मे २०२६ पासून सुरू होणार असून ४ जून २०२६ पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ अशी राहणार असून सार्वजनिक सुट्ट्या वगळून अर्ज स्वीकारले जातील. दाखल झालेल्या अर्जांची छाननी ५ जून रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर ८ जून रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ८ जून ते २२ जून २०२६ हा कालावधी देण्यात आला आहे. अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप २३ जून रोजी करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी ५ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर तत्काळ निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

निवडणुकीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १ हजार रुपयांची तर सर्वसाधारण उमेदवारांसाठी ५ हजार रुपयांची अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्राची किंमत २०० रुपये ठेवण्यात आली आहे. राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना सक्षम प्राधिकरणाचे जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना संबंधित दाखला सादर करावा लागणार आहे.

उमेदवार हा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक असून त्याच्याकडे किमान १० गुंठे शेती क्षेत्र असल्याचा ७/१२ उतारा तसेच शेतकरी असल्याचा दाखला जोडणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर येथील नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सभागृह क्रमांक १, तिसरा मजला येथे पार पडणार आहे. बाजार समितीवरील वर्चस्वासाठी तालुक्यातील राजकीय गटांमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता असून आगामी काही दिवसांत राजकीय बैठका, आघाड्या आणि प्रचाराच्या हालचालींना वेग येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय उलथापालथ; राजकीय गणितांना मोठा धक्का…

Video: शिरूर-आंबेगाव-हवेली मधील राजकीय नेत्यांनो उघडा डोळे अन् बघा निट…

शिरूर तालुक्यात निवडणूक जल्लोषानंतर शांतता अन् चर्चांना उधाण…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

5 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

6 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

6 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

6 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

7 तास ago

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदतीची मागणी; सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणाच्या भूमिपूजनासाठीही मागितली वेळ मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त…

7 तास ago