मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील वृद्ध महिलेची जमिन लुटण्यात भूमि अभिलेख विभागसुद्धा सामिल!

शिरूर : शिरूर भूमि अभिलेख विभागाकडून एका वृद्ध महिलेला सातत्याने जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार उघड झाला आहे. गावगुंड आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळेल्या वृद्ध महिलेने राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री व पुणे ग्रामीण अधिक्षक यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित वृद्ध महिलेची खाजगी जमिन लुटण्याचाच हा एक प्रकार असून, संगनमताने त्रास दिला जात असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे शिरूर भूमि अभिलेख विभागाचा काळा कारभार समोर आला आहे.

शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे श्रीमती सुवर्णा रविंद्र पवार (वय 68) यांची स्वःताची मालकिची आणि वहिवाटीची शेत जमिन आहे. संबंधित जागेचा सातबारा त्यांच्या नावावर आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून त्यांची जागा काही व्यक्तींकडून परस्पर बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. गटविकास अधिकारी आणि भूमि अभिलेख विभाग यामध्ये गावगुंडाना साथ देत असल्याचे कागदपत्रांवरून समोर आले आहे. राज्यात जमिन बळकावण्याचे प्रकार घडत असतानाच शिरूर तालुक्यातही असाच प्रकार उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

शिरूर भूमि अभिलेख विभागाने श्रीमती सुवर्णा रविंद्र पवार यांना कोणतीही पूर्णकल्पना अथवा नोटीस न देता परस्पर जमिनीची मोजणी केली. जमिनीची मोजणी केली जात असताना सरकारी महिला अधिकारी मोटारीमध्ये तर खासगी मोजणी करणारी व्यक्ती मोजणी करत होता. खाजगी मोजणी करणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून एकतर्फी हद्दीखुना दाखवून बेकायदेशीर पोल रोवले आहेत. या प्रकारामुळे मोठा मानिसक धक्का बसला आहे. माझ्या कुटुंबाबाबत यापूर्वीही असाच प्रकार घडला आहे, असे श्रीमती सुवर्णा रविंद्र पवार यांनी सांगितले. शिरूर भूमि अभिलेख विभागाचे उप अधीक्षक अमोल भोसले यांना घडलेल्या प्रकाराबाबत समक्ष भेटून सांगितल्यानंतर त्यांनी झालेली चुक मान्य केली आहे.

भूमि अभिलेख विभागाच्या कामाचा अनुभव असलेले तज्ज्ञ संजय काळे म्हणाले, ‘शिरूर भूमि अभिलेख विभागाची ही गंभीर चूक आहे. यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर तत्काळ कायदेशीर आणि फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. वारंवार असा प्रकार का घडत आहे, याबाबत सुध्दा चौकशी करणे जरुरीचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांमुळे एखाद्या कुटुंबाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा, सर्वसामान्य नागिरकांच्या जमिनी परस्पर दुसऱ्यांच्या नावावर केल्या जातील. भूमि अभिलेखमधील हा एक मोठा रॅकेटचाच प्रकार आहे.’
(क्रमशाः)

खासगी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ पाटी; शिरूरचे भूमिअभिलेख उपअधीक्षक चर्चेत

शिरूर भूमिअभिलेख कार्यालयाची उल्लेखनीय कामगिरी, विभागात तृतीय क्रमांक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

8 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago