महाराष्ट्र

शाखा तिथे संविधान ह्या शिवसेना अभियानाची मुंबईतुन सुरुवात….

मुंबई: शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून “*शाखा तिथे संविधान*” या अभियानाची सुरुवात भारतीय संविधान दिनाच्या पूर्व संध्येला शिवसेनेचे मुख्यालय बाळासाहेब भवन येथे संविधानाची प्रस्ताविका आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन करून शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषद सभापती निलमताई गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेनेचे प्रवक्ते व संयोजक किरण सोनावणे, माजी आमदार राम पंडागळे, शिवसेना मिडिया समन्वयक दिनेश शिंदे, विलास जोशी आदी उपस्थित होते.

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे या अभियानाच्या निमित्ताने म्हणाल्या की, भारतीय संविधान सर्वाना समान संधी, समान स्वातंत्र्य, समान न्याय आणि समान संधीची खात्री देते. शिवसेनाप्रमुख तर एकावेळी बोलताना म्हणाले होते की, न्यायालयात शपथ घ्यायची असेल तर ती संविधानावर हात ठेवून घेतली पाहिजे. या अभियानाने विरोधकांची तोंडे आपोआप बंद होतील जे संविधान बदलणार म्हणून कोल्हे कुई करत होते.

शाखा तिथे संविधान या अभियानाचे प्रमुख संयोजक आणि शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे म्हणाले की, शिवसेनेच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण असून शिवसेनेचा केंद्र बिंदू म्हणून ओळखले जाते त्या शिवसेनेच्या महाराष्ट्रातील तमाम शाखेत संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रतिमा आणि संविधानाची प्रत ठेवून संविधानिक मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येईल. ते पुढे म्हणाले की, एक शायर असं बोलतो “दोस्त, कभी फुरसत मिले तो मुझे पढना, मुझमे तेरे हर उलझनो का समाधान है, मै कोई और नही, मै तेरे देश का संविधान हू!

या अभियानाच्या अंतर्गत संविधान बाग, संविधान संग्राहलय, देशातील सर्व रेल्वे स्टेशन मध्ये संविधानाची प्रस्ताविका तसे आंतरराष्ट्रीय आणि देशी विमानतळावर संविधानाची उद्देशिका लावण्यासोबत, संविधानासाठी काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संघटना यांचा सन्मान, लोककलावंत यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येईल. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी आमदार राम पंडागळे यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

5 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago