mahesh dhamdhere

Video: घोडगंगा साखर कारखाना अशोक पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही: महेश ढमढेरे

शिरूर तालुका

न्हावरे (तेजस फडके): घोडगंगा साखर कारखाना अशोक पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असे अशी घणाघाती टिका विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी केली आहे.

‘गेल्या 25 वर्षात घोडगंगा सहकारी कारखान्यात केलेली लूट लोकांना कळू नये तसेच स्वतःच पाप झाकण्यासाठी विद्यमान अध्यक्ष अशोक पवार यांनी सर्वसाधारण सभेत सभासदांचा आवाज दाबला. त्यामुळे हा कारखाना वाचला पाहिजे म्हणून आम्ही सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन लढा देत आहोत. गेल्या 25 वर्षात अशोक पवार यांनी घोडगंगा कारखान्यावर 450 कोटी रुपयांचे कर्ज करुन ठेवले आहे. परंतु, घोडगंगा साखर कारखाना हा शिरुर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची कामधेनू असून शेतकरी याचे खरे मालक आहेत. घोडगंगा साखर कारखाना हा काही अशोक पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही,’ अशी घणाघाती टिका विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी केली.

रांजणगाव सांडस (शिरुर) येथे घोडगंगा किसान क्रांतीच्या प्रचार सभेत महेश ढमढेरे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आमदार अशोक पवार यांची घोडगंगा कारखान्यातली हुकूमशाही मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आमदार शेतकऱ्यांच्या पैशाचा प्रवासखर्च तसेच कोर्टात गैरवापर करत असून हा पैसा यांच्या घराचा आहे का…? सध्या तुम्ही फक्त घोडगंगा कारखान्याच्या प्रश्नावरच बोला. तालुक्यातील विकासावर बोलू नका. घोडगंगाचे कामगार आमदार पवार स्वतःच्या खाजगी व्यंकटेश साखर कारखान्यात वापरतात.’

घोडगंगात भ्रष्टाचार करुन अशोक पवारांनी व्यंकटेश उभारला: अ‍ॅड सुरेश पलांडे

Video: आम्ही चर्चेला कधीही तयार, वेळ आणि ठिकाण तुम्हीचं सांगा: सुधीर फराटे

खाजगी कारखाना काढण्याच पाप अशोक पवारांनी केलं: दादा पाटील फराटे