trupti-sarode
शिंदोडी (तेजस फडके) : शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार तृप्ती सरोदे यांना गटात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शिंदोडी येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या वेळी महिला भगिनी, शेतकरी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तृप्ती सरोदे यांनी सांगितले की, मागील काही महिन्यांपासून त्या आपल्या जिल्हा परिषद गटातील १७ गावांमध्ये व वाड्या-वस्त्यांवर प्रत्यक्ष भेटी देत आहेत. या दौऱ्यादरम्यान महिला, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेकांकडून शुभेच्छा आणि पाठिंबा मिळत आहे.
या वेळी त्यांनी गटातील प्रमुख समस्यांवर भाष्य केले. या झेडपी गटात रोजगाराचा अभाव, शेतकऱ्यांचे प्रश्न, बिबट्यांचा वाढता त्रास, रस्त्यांची दुरवस्था, महिलांच्या आरोग्याच्या समस्या तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित अडचणी आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडाही जाणवत आहे. या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे,” असे तृप्ती सरोदे यांनी सांगितले.
क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने झालेल्या या संवादातून ग्रामीण भागातील विकासाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृप्ती सरोदे यांच्या संपर्क मोहिमेला वेग मिळाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषद अपडेट! ज्योती मानसिंग पाचुंदकर यांची प्रचारात जोरदार आघाडी!
शिरूर मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी…
शिरुरच्या ७ जिल्हा परिषद गट तसेच १४ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…
आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…