Jyoti-Mansing-Pachundkar

जिल्हा परिषद अपडेट! ज्योती मानसिंग पाचुंदकर यांची प्रचारात जोरदार आघाडी!

मुख्य बातम्या राजकीय शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरूर) जिल्हा परिषद गटात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, या गटातून उमेदवारी करणाऱ्या ज्योती मानसिंग पाचुंदकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गट ‘फिक्स’ मानला जात असून, त्यांच्या प्रचाराला सर्व स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

ज्योती पाचुंदकर या प्रचारासाठी गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर तसेच घराघरांत जाऊन थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत. प्रचारादरम्यान त्या नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत असून, त्या सोडविण्याबाबत ठोस आश्वासने देत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, महिला व युवकांचे प्रश्न हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे ठरत आहेत.

प्रचारादरम्यान नागरिकांकडून त्यांचे ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत केले जात आहे. फटाक्यांची आतषबाजी, हारतुरे, ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत होत असून, महिलांचा आणि युवकांचा सहभाग विशेष लक्षणीय आहे. त्यांच्या प्रचार फेरीला लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. याचदरम्यान विविध विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. या भूमिपूजन कार्यक्रमांमुळे स्थानिक विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. ‘काम करणारी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी पुढे असणारी नेतृत्व म्हणून ज्योती मानसिंग पाचुंदकर यांच्याकडे पाहिले जाते,’ अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली.

रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात सध्या प्रचार शिगेला पोहोचला असून, एकूणच वातावरण पाहता ज्योती मानसिंग पाचुंदकर यांची बाजू भक्कम मानली जात आहे. पुढील काही दिवसांत प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, या गटात चुरशीची पण एकतर्फी लढत होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

रांजणगाव गणपती ZP गट! खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात: मानसिंग पाचुंदकर

शिरूर मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी…

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर…