मुख्य बातम्या

रांजणगाव-कारेगाव मूळ गटाचा कायापालट करणार : ज्योती मानसिंग पाचुंदकर

कान्हूर मेसाई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासाच्या संकल्पनेला अभिप्रेत असलेला रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट नागरिकांची समस्या सोडवून प्रगतीपथावर आणून त्याचा कायापालट करणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार ज्योती मानसिंग पाचुंदकर यांनी दिले आहे.

रांजणगाव कारेगाव मुळ जिल्हा परिषद गटात अंतर्गत रस्ते, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, जिल्हा परिषदेच्या शाळा, आरोग्य केंद्रे, तसेच सर्व सामान्य नागरिकांना व शेतकरी बंधूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन रांजणगाव जिल्हा परिषद गट प्रगतीपथावर आणणार असल्याचे आश्वासन सामान्य मतदार बंधू भगिनींना ज्योती पाचुंदकर यांनी दिले आहे.

शिरूर-आंबेगावचे भाग्यविधाते आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव कारेगाव मूळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्योती मानसिंग पाचुंदकर, पंचायत समिती गण कारेगाव-कान्हूर मेसाई राष्ट्रवादीकडून निर्मला शुभम नवले, पंचायत समिती रांजणगाव गणपती मूळ या गणातून महेश निवृत्ती फंड या तिन्ही उमेदवारांनी सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वृद्धिगत करून दिवंगत नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वृद्धिंगत करत साध्या पद्धतीने प्रचार करून नागरिकांचे आशीर्वाद घेण्यास सुरुवात केली आहे.

पुणे जिल्ह्यासाठी दिवंगत नेते अजित पवार यांनी विकास कामांसाठी भरघोस निधी असून नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा वाढू लागला असल्याचे जिल्हा परिषदेचे उमेदवार ज्योती पाचुंदकर यांनी सांगितले आहे. ग्रामीण भागातील विकास कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटीबद्ध असून नागरिकांचा प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागला असल्याचे कारेगाव -कान्हूर मेसाई पंचायत समिती गणाचे उमेदवार निर्मला नवले यांनी सांगितले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्गामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीनही उमेदवारांच्या बाबतीत भावनिक तसेच सहानुभूती मोठ्या प्रमाणात वाढू लागली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ज्योती मानसिंग पाचुंदकर यांना प्रचारात पतीची खंबीर साथ!

जिल्हा परिषद अपडेट! ज्योती मानसिंग पाचुंदकर यांची प्रचारात जोरदार आघाडी!

रांजणगाव गणपती ZP गट! खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात: मानसिंग पाचुंदकर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

5 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

6 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

6 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

6 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

6 दिवस ago