शिरुर (तेजस फडके) सध्याच्या युगात माणुस दिवसभर उपाशी राहील. पण दिवसभर मोबाईलशिवाय राहू शकत नाही. तसेच मोबाईल हि हौस नसुन गरज झाली आहे. आज लहान मुलांपासुन वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच मोबाईलचं व्यसन लागलं आहे. त्यात तरुणपिढी तर या सोशल मीडियावर फारच ऍक्टिव्ह असते. परंतु मोबाईलचे काही फिचर माहित नसल्याने किंवा चुकीचे अँप वापरुन ऑनलाईन व्हिडीओ सेक्स चॅटिंग करत सर्वसामान्य व्यक्तींना गंडा घालण्याचे प्रकार वाढत असून शिरुर तालुक्यातील अनेकांना लाखो रुपयांना फसवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
सध्या फेसबुकच्या मेसेंजरवर काही तरुणीच्या नावाने फेक अकाउंटवरुन मेसेज पाठवत सेक्स व्हिडीओ चॅटींग करणार का अशी विचारणा केली जाते. त्यानंतर व्हाट्स अँपचा नंबर मागितला जातो. काहीजण या मेसेजकडे दुर्लक्ष करतात. परंतु काहीजण अतिउत्साहाच्या भरात व्हाट्स अँप नंबर देतात आणि समोरच्या व्यक्तीच्या जाळ्यात अलगद अडकतात. त्यानंतर समोरुन व्हिडीओ कॉल करत अश्लील चॅटिंग करण्याची मागणी केली जाते.
त्यानंतर जर होकार दिला तर तात्काळ समोरची व्यक्ती तुमच्याशी व्हिडीओ कॉलिंगवर अश्लील हावभाव करत तुमचा व्हिडीओ काढुन पाच मिनिटात तुमच्या व्हाट्स अँप अकाउंटवर पाठवते आणि मग हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी करत तुम्हाला ब्लॅकमेल करत मानसिक त्रास दिला जातो. शिरुर तालुक्यात आजपर्यंत असे अनेक प्रकार घडले असुन या लोकांची लाखो रुपयांची फसवणूक झालेली आहे. परंतु बदनामीच्या भीतीने ”तेरी भी चूप अन मेरी भी चूप’ असं म्हणतं या फसवणूक झालेल्या व्यक्तींनी पोलिसांकडे जाण टाळलं आहे.
औद्योगिक वसाहतीतील कामगाराला 50 हजाराला गंडा…
आठच दिवसापूर्वी रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कपंनीत काम करणाऱ्या एका कामगाराला असच अश्लील व्हिडीओ चॅटिंगच्या नावाखाली बदनामीची धमकी देत 50 हजाराला गंडा घातल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली असून बदनामीच्या भीतीने त्या कामगाराने पोलिसांकडे जाण टाळलं तसेच आठ दिवस घराच्या बाहेर पडणंही बंद केल होत. त्यामुळे मोबाईलचे काही अप्लिकेशन वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा विनाकारण मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय.
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…