राजकीय

भुकेने मरणारे लोक हे चिंतेची बाब, केंद्राने आत्मपरीक्षण करण्याची गरज: अंबादास दानवे

मुंबई: देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आपण “हर घर तिरंगा” मोहीम हाती घेतली होती. मात्र ही मोहीम हाती घेताना आपल्या देशात अंबानी अदानी सारखे अब्जाधीश लोक राहतात. त्याप्रमाणे हजारो लोक हे भुकेने मरत आहे ही चिंतेची बाब असून या परिस्थितीचा विचार केला पाहिजे, अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारला टोला लगावताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वातंत्राच्या गौरवशाली लढ्यावर आपले मनोगत व्यक्त केले.

१९४७ मध्ये टाचणी सुद्धा तयार न करणाऱ्या आपल्या देशाने आज प्रगती साधत उपग्रह अवकाशात सोडून जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. शेतीचे उत्पादन वाढतय. मात्र शेतकरी सुरक्षित आहे का, असा सवाल करत दानवे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

राजीव गांधी ते प्रमोद महाजन यांच्या कार्यकाळात देशात १९८० च्या दशकात झालेली संगणक प्रगती, टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म ते सुपर कॉम्प्युटरचा उदय याचा पाढा वाचत सतत देशात गेल्या ७५ वर्षांत प्रगती झाली नसल्याचा आरोप करणाऱ्या भाजपला अप्रत्यक्षपणे सुनावले.

आपल्या देशाला भगवान श्री कृष्ण व भगवान श्रीराम, कुराण यांचा इतिहास आहे, तो इतिहास घेऊन आपण पुढे चाललो आहे. येणाऱ्या काळात सिंधू हिंदू संस्कृतीचा इतिहास जपण्याचे आव्हान आहे, खऱ्या अर्थाने गुण्यागोविंदाने आपण राहतो का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सर्वानांच आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले.

आपण भारत मातेचा उल्लेख माता करतो. देशाला मातेचा दर्जा केवळ हिंदुस्थानाला मिळाला आहे.आपल्या देशाला २०० वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे तो भारत देश विसरु शकत नाही. या इतिहासाची प्रेरणा घेऊन आपण वाटचाल करत आहोत. आज अनेक जण म्हणतात, आम्ही उठाव केला, पण खरा उठाव हा मंगल पांडेंनी गोमातेच्या रक्षणासाठी केला होता. याची जाणीव करुन देत सध्या गोमतेवरुन राजकारण करणाऱ्यांना त्यांनी चिमटा काढला.

महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रमाणेच धुळेच्या बाबू गेनू यांच्यामुळेही स्वातंत्र्य मिळाल्याची आठवण दानवे यांनी यावेळी करून दिली.

पूर्वी चारही बाजूने हिमालय व समुद्रकिनारे या नैसर्गिक सीमांच तटरक्षण भारताला होत, मात्र आता समुद्रकिनारेही सुरक्षित नसल्याचे त्यांनी सांगत सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. हिमालयाच्या पाठीशी नेहमी सह्याद्री उभा राहिला, त्याप्रमाणे हिंदुस्थानच्या प्रगतीत महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिला असल्याचे सांगत दानवे यांनी महाराष्ट्राचे देशाच्या प्रगतीत असलेले महत्त्व अधोरेखित केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

12 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

19 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

19 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

1 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

3 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

3 दिवस ago